Nashik News : भारतीय जनता पक्षाने (BJP) सत्तेत आल्यास 100 दिवसांत 'ईपीएस' पेन्शनधारकांची किमान पेन्शन तीन हजार रुपये करण्याची घोषणा केली होती. पण सत्तेवर आल्यावर ते सर्व विसरले आहेत. यासंदर्भात देशभर आंदोलन सुरू असूनही केंद्र सरकार दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या पेन्शनधारकांनी पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांची चांगलीच कोंडी केली आहे.
पंतप्रधान मोदी 12 जानेवारीला राष्ट्रीय युवक संमेलनासाठी नाशिकला (Nashik) येत आहेत. या दौऱ्यात त्यांनी पेन्शनधारकांना भेटीसाठी वेळ द्यावा, अशी मागणी पेन्शनधारकांची आहे. अन्यथा या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर मूक निदर्शने करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
यासंदर्भात EPS 95 च्या पेन्शनर्सच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट मिळावी, यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेन्द्र वाघ यांना निवेदन दिले आहे. तसेच पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे 11 जानेवारीला काळाराम मंदिरामध्ये केंद्र हे शिष्टमंडळ, सरकारने किमान जगता येईल, एवढी नऊ हजार रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता लागू करावा, यासाठी प्रभू श्रीरामाला साकडे घालणार आहेत.
देशभरातील 75 लाखांहून अधिकाधिक EPS 95 पेन्शनरांच्या वतीने साकडे घातले आहे. आम्ही देशभरातल्या 186 उद्योगांमधील निवृत्त कर्मचारी आहोत. हे उद्योग देशाला वस्तू व सेवा पुरवतात. त्यात आम्ही आयुष्यातील 30 ते 40 वर्षे काम केले आहे. आमच्या कष्टातून आम्ही या देशात बदल घडवून महासत्ता बनण्याच्या उंबरठ्यावर आणले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
देशभरात 20 लाखांहून अधिक पेन्शनर्सना फक्त एक हजार किंवा त्यापेक्षा कमी पेन्शन मिळते. सरासरी दीड हजार रुपये पेन्शनदेखील नाही. अतिशय तोकडी पेन्शन, त्याला महागाई भत्त्यापासून संरक्षण नाही, संपूर्ण वैद्यकीय सुविधेचे संरक्षण नाही, ही आमची परिस्थिती आहे, अशी व्यथा हे पेन्शनर्स मांडत आहेत.
भगतसिंह कोश्यारी राज्यसभेत असताना त्यांच्या अध्यक्षेखाली 2013 मध्ये समिती नेमली होती. या समितीने महागाई भत्त्यासह किमान पेन्शन 3 हजार रुपये लागू करावी, अशी शिफारस केली होती. त्याची आठवण EPS 95 चे पेन्शनर पंतप्रधानांना करून देत आहे.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.