Ajit Pawar : वसईकरांसाठी अजित पवार ठरले 'भगीरथ'; सूर्या योजनेमुळे पाणीप्रश्न सुटला : ठाकूरांनी जागावल्या आठवणी

Hitendra Thakur Statement : सुर्या पाणीपुरवठा योजनेला निधी देत अजित पवारांनी वसईकरांचा पाणी प्रश्न सोडवला, अशी आठवण हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केली. त्यांच्या निधनाने वसई-विरार हळहळला आहे.
Former MLA Hiten Thakur remembering Deputy CM Ajit Pawar for approving the Surya Water Supply Scheme, which permanently solved Vasai-Virar’s long-standing water crisis.
Former MLA Hiten Thakur remembering Deputy CM Ajit Pawar for approving the Surya Water Supply Scheme, which permanently solved Vasai-Virar’s long-standing water crisis.Sarkarnama
Published on
Updated on

Vasai Virar News : वसईकरांना पाण्याचा प्रश्न सतावत होता. त्यावेळी तत्कालीन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी राज्य सरकारकडे सुर्या पाणी पुरवठा योजनेची मागणी केली होती. परंतु त्यावेळी वसई हे एमएमआरडीए क्षेत्राच्या बाहेर असल्याने त्यांना आर्थिक मदत कशी करणार असा प्रश्न पडल्यावर अजितदादांनी पुढाकार घेऊन या योजनेसाठी निधी देऊन वसईकरांच्या पाण्याचा प्रश्न सोडविला होता. त्याची आठवण आज वसईकरांना झाली आणि वसई विरारकर नागरिक हळहळले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरल्यानंतर त्यांच्या बाबतच्या आठवणींना अनेकांनी उजाळा दिला. आज अजित दादांच्या मृत्यूची बातमी समजल्यावर वसई चे माजी आमदार हितेंद्र ठाकूर भावुक झालेले पहायला मिळाले. यावेळी त्यांनी सांगितले की, राजकारणातील दादा माणूस गेला.

घरातील मोठा दादा तसाच राजकारणातील दादा असलेले अजित दादा रोख ठोख बोलणारे, परखड स्पष्टवक्ते व्यक्तीमत्व होते. एखादे काम होणार असेल तर होईलच असे सांगणारे अजित दादा होते. नागरिकांशी निगडित असलेले एखादे काम असेल तर ते नियमात कसे बसेल हे अधिकाऱ्यांना सांगणारे दादा होते. वसई च्या दृष्टीने सुर्या पाणी पुरवठा योजना महत्वाची होती परंतु त्याला अनेक अडचणी येत होत्या याबाबत अजित दादा ना भेटल्यावर त्यांनी तात्काळ याबाबत अधिकाऱ्यांना त्यावेळी आदेश दिले होते.

Former MLA Hiten Thakur remembering Deputy CM Ajit Pawar for approving the Surya Water Supply Scheme, which permanently solved Vasai-Virar’s long-standing water crisis.
Vasai-Virar Mahapalika: भाजपच्या उधळलेल्या वारूला लगाम घालणारी एकमेव महापालिका... अजितदादा, ठाकरे बंधूंना न जमणारी गोष्ट ठाकूरांना जमणार?

त्यामुळे आज वसईकरांना पाणी मिळू शकले आहे. अजित दादांचे वसई विरारवर विशेष प्रेम होते. वसईच्या विकाससासाठी लागणाऱ्या योजनेसाठी लागणारा निधी त्यांनी कधीच कमी पडू दिला नाही आणि यापुढेही कधीही कमी पडू देणार नाही असे आश्वासनही दादांनी दिले होते. त्यामुळे वसई- विरार बरोबर महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे.

Former MLA Hiten Thakur remembering Deputy CM Ajit Pawar for approving the Surya Water Supply Scheme, which permanently solved Vasai-Virar’s long-standing water crisis.
Ajit Pawar death news : अजितदादांशिवाय राज्याचं राजकारण बेचव अन् आळणी; संजय राऊतांची प्रतिक्रिया

दोन दिवसांपूर्वीच त्यांचा मला बहुजन विकास आघाडीच्या वसई विरार महानगरपालिकेतील विजया बद्दल अभिनंदन करणारा फोन आला होता. आज त्यांच्या निधनाने आमच्यावर प्रेम करणारा आमच्या कुटुंबातील मोठा भाऊ गेला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशी भावना हितेंद्र ठाकुर यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com