मोठी बातमी : महाराष्ट्रातील 3 विमानतळांना मिळणार नवीन ओळख; नामांतरावर CM फडणवीस यांच्याकडून शिक्कामोर्तब

Navi Mumbai Airport : पुणे विमानतळाला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं नाव तर छत्रपती संभाजीनगरला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यावरही शिक्कामोर्तब केलं आहे.
names of Navi Mumbai, Pune and Chhatrapati Sambhajinagar airports in Maharashtra are to be changed.
names of Navi Mumbai, Pune and Chhatrapati Sambhajinagar airports in Maharashtra are to be changed.sarkarnama
Published on
Updated on

Navi Mumbai Airport : महाराष्ट्रातील 3 मोठ्या विमानतळांना नवीन ओळख मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या 3 विमानतळांच्या नामांतरावर शिक्कामोर्तब करण्यात आला. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. यात नवी मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या विमानतळांचा समावेश आहे.

names of Navi Mumbai, Pune and Chhatrapati Sambhajinagar airports in Maharashtra are to be changed.
Karur Stampede SIT: तमिळ सुपरस्टार विजयच्या अडचणी वाढल्या! चेंगराचेंगरी प्रकरणी हायकोर्टानं झाप झाप झापलं अन् SITचे दिले आदेश

या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार आहे. या अनुषंगाने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी विनंती केली होती. या नामकरणासाठी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह पुण्यातील सध्याच्या विमानतळाला जगद्गुरु संत तुकाराम यांचे नाव देण्यासाठीचा आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. तिन्ही प्रस्ताव केंद्र शासनाच्या विचाराधीन असून राज्य शासनाच्या मागणीनुसार व नवीन धोरणानुसार नामविस्तारांना लवकरच मान्यता मिळणार आहे. इतर राज्यातील देखील प्रस्ताव मान्यतेसाठी प्रतिक्षेत आहेत.

names of Navi Mumbai, Pune and Chhatrapati Sambhajinagar airports in Maharashtra are to be changed.
Nashik Police: नाशिकमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या! आमदारांनी घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणासाठी आंदोलनकर्त्यांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील. या आंदोलनातील गुन्ह्यांमुळे विमानतळावर नोकरी मिळण्यात अडचण येऊ नये, यासाठी हे गुन्हे रद्द करण्याचे निर्देश देण्यात येतील. काही आंदोलने कोविड काळात देखील झाले असल्याने काही आंदोलनकर्त्यांवर कोविड तरतुदीनुसार गुन्हे दाखल असून असे गुन्हे नियमानुसार न्यायालयाच्या परवानगीने मागे घेण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

names of Navi Mumbai, Pune and Chhatrapati Sambhajinagar airports in Maharashtra are to be changed.
Nashik Police: नाशिकमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या! आमदारांनी घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट

यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी स्वागत करून प्रास्तविक केले. तसेच आमदार रवींद्र चव्हाण, लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, माजी खासदार कपिल पाटील, खासदार सुरेश (बाळ्या) म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार रामशेठ ठाकूर व लोकप्रतिनिधींनी भूमिका मांडली. यावेळी आमदार महेश बालदी, माजी खासदार संजय पाटील, माजी खासदार संजीव नाईक, जगन्नाथ पाटील, राजू पाटील, सुभाष भोईर, जे. एम. म्हात्रे , जगदीश गायकवाड, दशरथ भगत, जे.डी. तांडेल यासह लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com