Navi Mumbai Election 2025: नवी मुंबईत मविआ भरकटली! एकत्र लढण्याबाबत नेते संभ्रमात, निरोपाची प्रतीक्षा

Navi Mumbai Municipal Election 2025 : विविध पातळीवर दुसऱ्या पक्षातील माजी नगरसेवकांची फोडाफोडीचे राजकारण शिंदेसेनेतर्फे केले जात आहे.
Navi Mumbai News :
Navi Mumbai News :Sarkarnama
Published on
Updated on

Navi Mumbai Municipal Election 2025: नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. एकीकडे भाजप, शिवसेना शिंदे गटांत महायुती होणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षातील नेते प्रदेश कमिटीच्या आदेशांची प्रतीक्षा करीत असल्याने सध्यातरी नवी मुंबईत मविआ भरकटल्याचे चित्र आहे.

Navi Mumbai News :
Chandrapur Election: विखुरलेल्या भाजपला अन् एकत्र काँग्रेसला तिसऱ्या आघाडीचे आव्हान! कसा असेल राजकीय खेळ?

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. प्रचार, तयारी करण्यासाठी दिवस कमी असल्याने महायुतीच्या मित्र पक्षांमध्ये वेग धरला आहे. विविध पातळीवर दुसऱ्या पक्षातील माजी नगरसेवकांची फोडाफोडीचे राजकारण शिंदेसेनेतर्फे केले जात आहे. भाजपकडून इतर पक्षातील माजी नगरसेवक गळाला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे; परंतु याउलट परिस्थिती मविआमधील पक्षांमध्ये झाली आहे.

काँग्रेसमध्ये अद्यापही एकसंधता आलेली नाही. पक्षाची बैठक, कार्यकर्ते, सभासद नोंदणी अशी सर्व कामे संथगतीने सुरू आहेत. पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी दुर्लक्षित पडल्याने स्पष्टता राहिलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात काही दिवसांपूर्वीच डॉ. मंगेश आमले यांच्या रूपाने नवीन जिल्हाध्यक्ष मिळाला आहे; मात्र त्यांनी पक्षाच्या बांधणीच्या अनुषंगाने वेग पकडला नाही. त्यामुळे नवी मुंबईतील विखुरलेल्या पदाधिकाऱ्यांना एकत्र आणून पक्षाला ऊर्जा भरण्याचे मोठे आव्हान आमले यांच्यासमोर आहे. तर शिवसेनेच्या ठाकरे गटापुढे माजी नगरसेवकांना थांबवण्याचे आव्हान आहे. सध्या महापालिकेत ठाकरे गटाकडे दोन आकडी माजी नगरसेवक राहिलेले नाहीत. त्यामुळे मविआतील प्रत्येक जण वैयक्तिक पातळीवर निवडणुकीची तयारी करीत असताना दिसत आहेत.

Navi Mumbai News :
Kolhapur Election 2025 : कोल्हापुरात महायुतीचा पहिल्या उमेदवाराची मुश्रीफांकडून घोषणा; कोण आहे हा उमेदवार?

मनसेकडून तयारी

महाविकास आघाडीत मनसेला घेण्याला काँग्रेसचा विरोध आहे. त्यामुळे नवी मुंबईत मविआसोबत लढणार की नाही, याबाबत मनसेच्या स्थानिक नेत्यांना पक्षश्रेष्ठींकडून निरोप आलेला नाही; परंतु महापालिका निवडणूक लढवणार असल्याचे प्रवक्ते गजानन काळे यांनी स्पष्ट केले. फक्त कोणासोबत जायचे, की स्वतंत्र लढवायचे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही; परंतु निवडणुकीच्या धर्तीवर कार्यकर्त्यांच्या बैठका, मुलाखती, अर्जदारांची कागदपत्रे तयार करण्याचे काम सुरू आहे. ८२ ठिकाणी इच्छुकांनी तयारी केली असल्याचे काळे यांनी सांगितले.

Navi Mumbai News :
नवी मुंबईत सत्ता समीकरणांना वेग! 'अशी' आहे पक्षांची रणनिती

मैत्रीपूर्ण लढतीचा निर्धार

प्रभाग क्रमांक २२ नेरूळ सेक्टर दोन आणि चार, जुईनगर आणि सानपाडा सेक्टर १० असा परिसर येतो. या भागातून शिवसेनेचे दोन नगरसेवक निवडून आलेले आहेत; परंतु गेल्या दहा वर्षांत या भागात काँग्रेसने मुसंडी मारली असून जनसंपर्क वाढवण्यासाठी चार कार्यालये थाटली आहेत. त्यामुळे या भागात काँग्रेस विरुद्ध महायुती अशी थेट लढत होईल. महाविकास आघाडी झाली नाही तर काँग्रेसतर्फे चारही जागांवर उमेदवार उभे करून मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.

Navi Mumbai News :
Top 10 News : शरद पवारांच्या पक्षाचे 5 खासदार शहांकडे, कोकाटेंचं दुसरं मंत्रिपदही धोक्यात,पृथ्वीराज चव्हाणांच्या नव्या बॉम्बनं खळबळ

दरम्यान, काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशी महाविकास आघाडी लढणार आहे. या आघाडीमध्ये मनसेला घ्यायचे की नाही, याबाबत निश्चितता नाही. काँग्रेसकडून ५० जागांवर दावा करणार आहोत, असं काँग्रेसच्या नवी मुंबई महापालिका निवडणूक समिती अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी सांगितलं आहे. तर महाविकास आघाडीसोबत एकत्र लढण्याची शक्यता आहे. परंतु पक्षप्रमुख यांचा आदेश अंतिम असेल. त्यानुसार १११ जागांवर तयारी सुरू आहे. ठाकरे गट हा पक्ष जनतेच्या मनातील पक्ष आहे. लोकाभिमुख कामे करत असल्याने आमच्या बाजूने कौल देतील, अशी अपेक्षा आहे, असं ठाकरेंच्या शिवसेनेचे नवी मुंबईचे उपनेते विठ्ठल मोरे यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com