Mumbai News : शिवडी - न्हावाशेवा सागरी मार्गावर टोल लागू करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय...

Shivdi - Nhava Sheva sea route : रायगड विभागातील स्थानिकांना टोलमाफी देण्याची मागणी...
Shivdi - Nhava Sheva sea route
Shivdi - Nhava Sheva sea route Sarkarnama

- जुई जाधव

Mumbai News : शिवडी - न्हावाशेवा या समुद्र मार्गावर 250 रुपये टोल लागू करण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या मार्गाचे उदघाटन येत्या 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मात्र रायगड भागातील स्थानिकांचं म्हणणं आहे, की त्यांना हा मार्ग मोफत असावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शिवडी - न्हावाशेवा हा 22 किलोमीटरचा रस्ता असून जगातील सर्वात मोठा सागरी मार्ग आहे. या प्रकल्पासाठी उरण भागातील स्थानिकांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या असून हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी स्थानिकांचा मोलाचा हातभार लागला असल्याचा दावा रायगड (Raigad) जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी केला आहे.

Shivdi - Nhava Sheva sea route
Maratha Reservation : मनोज जरांगे- पाटलांच्या आंदोलनासाठी मुंबईत 'या' तीन मैदानांची पाहणी

या सागरी सेतूवर चारचाकी वाहनांसाठी 250 रुपये टोल आकारला जाईल, असा निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तरी हा टोलनाक्यावर न्हावा, न्हावा खाडी, गव्हाण, शिवाजीनगर, गव्हाण कोपर, मोरावे, वहाळ, बामनडोंगरी, जासई, शेलघर, जावळे, चिर्ले, गावठाणसह संपूर्ण उरण तालुका स्थानिकांना टोलमाफी देण्यात यावी.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि 'एमएमआरडीए'कडे करण्यात आलेली आहे. स्थानिकांना टोलमाफी मिळाली, तर सागरी सेतूवरून प्रवास करताना ग्रामस्थ्यांना दिलासा मिळेल, अशी भावनादेखील त्यांनी व्यक्त केली आहे. लवकरात लवकर याबाबत निर्णय व्हावा, अशी मागणी स्थानिकांनी लावून धरली आहे.

आदित्य ठाकरे यांनी केले होते 'ट्विट'...

राज्य सरकारच्या मंत्री मंडळाच्या निर्णया आधी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ट्विट करीत सरकारला आव्हान दिलं होतं, की हिम्मत असेल तर टोल माफ करून दाखवा. परंतु सरकारने निर्णय घेतल्यावरदेखील अनेक दावे-प्रतिदावे केले गेले. विरोधकांकडून या निर्णयाचा निषेध केला गेला तर सत्ताधाऱ्यांकडून हा निर्णय कसा योग्य आहे, याचं स्पष्टीकरण दिलं.

(Edited by Amol Sutar)

Shivdi - Nhava Sheva sea route
Yavatmal : तहसीलदारांच्या दालनात शेतकऱ्याने घेतले विष; न्याय मिळत नसल्याने...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com