Beed Bjp News : म्हस्के लोकसभा निवडणूक प्रमुख, मुंडे, धसांवर विधानसभेची जबाबदारी...

Beed : लोकसभा प्रमुखांच्या नियुक्त्या गुरुवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्या.
Beed Bjp News
Beed Bjp NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : वर्षभरावर लोकसभा निवडणुक आली आहे. तर, त्यानंतर विधानसभेचीही निवडणुक काही दिवसांनी येत आहे. या दोन्ही निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने भाजपने एक पाऊल टाकले आहे. (Beed Bjp News) लोकसभा व विधानसभा प्रमुखांच्या नियुक्त्या राज्यपातळीवरुन गुरुवारी (ता. आठ) घोषित झाल्या. यात भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांच्यावर बीड लोकसभा निवडणूक प्रमुख ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Beed Bjp News
Bjp Appoint Loksbha Constituency Head News : लोकसभा निवडणूक प्रमुखांची निवड करतांना भाजपने नव्या-जुन्यांची घातली सांगड..

तर, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आमदार सुरेश धस, मोहन जगताप, शरद इंगळे व शाम कुंड यांच्यावर विधानसभा प्रमुख या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. (Beed News) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नऊ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर भाजपने अभियान हाती घेतले. (Bjp) आता आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राज्यभरात लोकसभा प्रमुखांच्या नियुक्त्या गुरुवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्या.

यामध्ये भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यावर लोकसभा प्रमुख ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर, त्यांच्याकडे बीड विधानसभा प्रमुख ही देखील दुहेरी जबाबदारी पक्षाने दिली आहे. यासह खासदार डॉ. प्रितम मुंडे (Pritam Munde) यांच्यावर परळी विधानसभा प्रमुख ही जबाबदारी असेल.

तर, लातूर - उस्मानाबाद - बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांच्यावर आष्टी/पाटोदा/शिरुर कासार या विधानसभा मतदार संघाची जबाबदारी असेल. मोहन जगताप यांच्याकडे माजलगाव मतदार संघाची जबाबदारी असून केज मतदार संघ प्रमुख म्हणून शरद इंगळे काम पाहणार आहेत. तर, शाम कुंड हे गेवराई विधानसभा प्रमुख म्हणून काम पाहतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com