Rahul Kalate : भाजप हा निष्ठुर पक्ष; राहुल कलाटेंनी सांगितलं कारण, म्हणाले...

Chinchwad By-Election : राष्ट्रवादीच्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न की भाजपच खरा प्रतिस्पर्धी?
Rahul Kalate
Rahul KalateSarkarnama

By poll Election : चिंचवड पोटनिवडणुकीत शिवसेनेत बंडखोरी करून राहुल कलाटे यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांच्यावर सतत तीव्र शब्दात टीका करण्यात येत आहे.

कलाटे यांना भाजपने उभे केल्याचे आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला. त्यानंतर कलाटे यांच्यावर सतत त्याचपद्धतीने टीका होत आहे. दरम्यान कलाटेंनी निष्ठुर पक्ष म्हणून भाजपचा कडक शब्दात समाचार घेतला. त्यामुळे चिंचवड परिसरात आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

Rahul Kalate
Ashok Chavan News : विखे माझे मित्र, पण ते शत्रूसारखं का वागतायेत ?

सतत टीका करणाऱ्या राष्ट्रवादी सोडून आज राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला आहे. यातून त्यांनी मुख्य प्रतिस्पर्धी कोणाला मानतात हेच दाखवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच भाजपने आपल्याला उभे केल्याची राष्ट्रवादीने सुरु केलेली चर्चा निष्फळ आहे, हे सिद्ध करण्यासाठी भाजपवरच टीका केल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांना खरंच भाजपने डमी उमेदवार म्हणून उभे केले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. Chinchwad By Poll Election

Rahul Kalate
Shivsena Symbol : तुमाणेंनी फोडला बाँब : ठाकरेंचे 2 खासदार, 10 आमदार फुटणार असल्याचा दावा!

राहुल कलाटे (Rahul Kalate) म्हणाले की, चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. लक्ष्मण जगताप हे आजाराशी झुंज देत होते, त्यावेळीच त्यांना सरणावर चढवायची घाई भाजपला झाली होती. त्यावेळीच भाजपने या निवडणुकीची तयारी सुरू केली होती, असा गंभीर आणि खळबळजनक आरोप कलाटेंनी केला आहे. त्यातून निष्ठूर भाजपने सहानुभूती या शब्दाचा गळा घोटला आहे. त्यामुळे त्यांना लोकांची सहानुभूती मिळणार नाही, असेही कलाटे यावेळी म्हणाले.

Rahul Kalate
Maharashtra Politics : निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय नंतर काय असणार भाजपचे पुढचे लक्ष? प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर

Chinchwad चिंचवडचा विकास केला म्हणणाऱ्यांनी आधीच विकास झालेल्या भागाचा (Samrt City) स्मार्ट सिटीअंतर्गत विकास केल्याचा भास निर्माण केला. हे न ओळखण्याइतकी जनता दूधखुळी नाही, अशी टीका त्यांनी केली.

भाजपने बंद जलवाहिनी प्रकल्प, रेड झोनसारखे प्रश्न लोंबकळत ठेवले, हे जनतेला माहीत आहे. 2014 आणि 2019 च्या विधानसभेला लक्षणीय मते घेतली असल्याने मला यावेळी सहानुभूती मिळेल.

चिंचवडमध्ये इतिहास घडेल व एक लाखाच्या मताधिक्याने आपण विजयी होऊ असा दावाही कलाटे यांनी यावेळी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com