Dharashiv News : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मंदिर (Tuljapur Bhavani Mandir) विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरून वाद सुरू झाला आहे. दर्शन मंडप मंदिरातच व्हावा, या मागणीसाठी आज तुळजापूर बंद आहे.
तुळजाभवानी मंदिर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरून हा वाद सुरू आहे. हा दर्शन मंडप घाटशीळ येथे न करता मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. दर्शन मंडपावरून पुजारी व व्यापाऱ्यानी संताप व्यक्त केला आहे. तुळजाभवानी प्रारूप विकास आराखड्यातील दर्शन मंडपाबाबत तत्काळ निर्णय घ्या, अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पुजारी व स्थानिकांनी दिला आहे.
बंदच्या आवाहनानंतर मोठ्या संख्येने पुजारी व व्यापारी तुळजाभवानी मंदिराच्या प्रवेशद्वारावर जमा झाले होते. दर्शन मंडप घाटशीळ भागात न करता मुख्य महाद्वारावरच झाला पाहिजे, अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. देवीच्या मुख्य महाद्वारासमोर महाआरती करण्यात आली.
आजच्या बंदला मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रशासनाने सर्वांना विश्वासात घेऊन दर्शन मंडप हा प्रवेशद्वारावरच करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तुळजापूर भवानीच्या मंदिरात दर्शन मंडप घाटशीळ येथे करण्यास पुजार्यांचा, व्यापारी आणि काही स्थानिक लोकांचा विरोध आहे. त्यांच्याकडून तुळजापूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.