Pimpri-Chinchwad News : राहुल गांधीची खासदारकी रद्द करण्याविरोधात पिंपरी-चिंचवड काँग्रेसने जनआंदोलन छेडले आहे. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलेली 'पहले लढे थे गोरोंसे, अब लढेंगे चोरोंसे' ही घोषणा लक्षवेधी ठरली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकारचा निषेध व्यक्त केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या सावरकरांविषयीच्या वक्तव्याविरोधात पिंपरी-चिंचवड भाजपने शहरात बुधवारी (ता. २९) 'आम्ही सारे सावरकर'चे फलक लावले. तसेच भाजप (BJP) सावरकर गौरव यात्रा काढणार आहे. तर, गांधीची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसनेही बुधवारपासून भाजपविरुद्ध जनआंदोलन सुरु केले आहे. त्याच्या पहिल्या टप्यात स्वाक्षरी मोहीम सप्ताह सुरु करण्यात आला आहे. तर, आज संकल्प सत्याग्रह आंदोलन केले. यानंतर २ एप्रिल रोजी 'जेल भरो आंदोलन' काँग्रेस (Congress) करणार आहे.
गांधी यांनी संसदेमध्ये केंद्र सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भांडवलदार गौतम अदानी यांचे संबंध काय? अदानी यांच्या कंपनीत २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक कोठून आली? असे प्रश्न विचारले होते.
या प्रश्नांचे उत्तर देण्याऐवजी हुकूमशाही पद्धतीने गांधींची खासदारकी रद्द करण्याचा कुटील डाव भाजप सरकारने केला. संसदेत खासदारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्र सरकार का करत आहे, याचा जाब विचारण्यासाठी सत्याग्रह आंदोलन केल्याचे पिंपरी चिंचवड काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी सांगितले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी 'पहले लढे थे गोरोंसे, अब लढेंगे चोरोंसे' अशी घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.