Pimpri Chinchwad News: अखेर अवैध होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी सात तासानंतर गुन्हा दाखल,पोलीस म्हणाले...

Crime News : अवैध होर्डिंग दुर्घटनेला पिंपरी-चिंचवड महापालिकाच जबाबदार...
Pimpri Chinchwad News
Pimpri Chinchwad NewsSarkarnama

Pimpri Chinchwad News : पिंपरी-चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यामुळे सोमवारी (ता.१७)सायंकाळी अनधिकृत होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात पाचजण मृत्युमुखी पडले,तर तिघे गंभीर जखमी झाले.याप्रकरणी आज (ता.१८) स्थानिक रावेत पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.मात्र,अद्याप कुणालाही अटक केली नाही.

रविवारी (ता.१६)खारघर,नवी मुंबईतील महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात १३ श्री सेवकांचा उष्माघाताने बळी गेला. प्रमुख पाहूण्यांना थंडगार छत,तर २५ लाख उपस्थित सर्वसामान्य श्री सेवकांना शेडविना ४२डिग्री तापमानाच्या रखरखत्या उन्हात बसवल्याने ती दुर्घटना घडली. मात्र,राज्याच्या सांस्कृतिक विभागाने हा सोहळा आयोजित केला असल्याने त्याप्रकरणी सदोष मनुष्य़वधाचा गुन्हा दाखल झाला नाही. तर, होर्डिंग अपघातात एफआयआर नोंदविण्यात आला असला,तरी त्याला अप्रत्यक्ष जबाबदार पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला पोलिसांनी तूर्तास,तरी हुशारीने दूर ठेवले आहे.

Pimpri Chinchwad News
NCP-BJP Politics : 'आता लोकही आमच्याकडे संशयाने पाहायला लागलेत'; दिलीप मोहिते-पाटलांची माध्यमांना विनंती

सोमवारी (दि.१७) सायंकाळच्या साडेपाचच्या या दुर्घटनेप्रकरणी सात तासानंतर (मध्यरात्री साडेबारा वाजता) पोलिसांनी गुन्हा दाखल केला.तरीही ही कार्यवाही विनाविलंब केल्याचा दावा त्यांनी केला आहे. तो उशिराने दाखल करताना त्यांनी सावधगिरी बाळगली आहे. कारण, या बेकायदेशीर होर्डिंगला अप्रत्यक्षरित्या अभय असलेला पिंपरी-चिंचवड(Pimpri Chinchwad) महापालिकेचा आकाशचिन्ह परवाना विभाग आणि तेथील अधिकाऱ्यांची नावे एफआयआरमध्ये घेण्यात आलेली नाहीत.

हे अनधिकृत होर्डिंग ज्या खासगी जागेत होते त्याचा मालक (नामदेव बारकू म्हसूदगे), होर्डिंग बनवणारा (दत्ता गुलाब तरस), ते भाड्याने घेणारा (महेश तानाजी गाडे) आणि जाहिरात करणारी कंपनी (एजन्सी)आणि इतर सबंधित त्यात आरोपी करण्यात आले आहेत.म्हणजे इतर (पालिका अधिकारी) या गुन्ह्यात सहभागी असल्याचा संशय पोलिसांनाही आहे.

Pimpri Chinchwad News
Sanjay Shirsat On Ajit Pawar: राष्ट्रवादीत शरद पवारांपेक्षा अजित पवारांची ताकद मोठी; शिरसाटांचं मोठं विधान!

बेकायदेशीर होर्डिंग उभारू न देण्याची आणि ते उभारलेच तर ते काढून टाकण्याची जबाबदारी ही महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाची आहे.त्यामुळे कालच्या या अवैध होर्डिंग दुर्घटनेला तेच जबाबदार आहेत.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या जैसे थेच्या आदेशामुळे शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई न झाल्याची सबब देऊन पालिका प्रशासनाने आपली जबाबदारी झटकली आहे.पण, स्थगिती ही आता मिळाली असून अवैध होर्डिंग्जचा प्रश्न हा गेल्या कित्येक वर्षांपासून सतावतो आहे. अशी शेकडो होर्डिंग्ज शहरात उभी असून त्यापासून मलई मिळत असल्याने आकाशचिन्ह परवाना विभाग व तेथील अधिकारी त्याकडे हेतूपुरस्पर दूर्लक्ष करीत असल्याची चर्चा आहे.

Pimpri Chinchwad News
Pune News : पुणेकरांनो,सावधान! आता विनाहेल्मेट प्रवास करणं महागात पडणार; आरटीओ 'अॅक्शन मोड'वर

दरम्यान,होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख हे पुण्यातून पिंपरी-चिंचवडमध्ये किवळे येथे काल रात्री आले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनीही अपघाताच्या ठिकाणी भेट दिली.पण, पिंपरीत असूनही पालिका आयुक्त शेखरसिंह हे दुर्घटनेच्या जागी गेलेले नाहीत.त्यामुळे त्याची जोरदार चर्चा आहे.तर,आकाश चिन्ह विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त प्रशांत जोशी हे कालपासून नॉट रिचेबल आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com