Rahul Kalate Vs Nana Kate : ठाकरे शिवसेना काटेंबरोबर, बंडखोर कलाटेंना थारा नाही!

Chinchwad By Election: पक्षनेतृत्वाला आव्हान देण्याची कलाटे यांची ही पहिलीच वेळ नाही..
Rahul Kalate, Nana Kate
Rahul Kalate, Nana Kate Sarkarnama

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad News : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज मोठा ट्विस्ट आला.महाविकास आघाडीने आपला उमेदवार (राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाना काटे) जाहीर करताच लगेचच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे राहुल कलाटे यांनीही अपक्ष लढण्याची घोषणा केली.मात्र,ठाकरे शिवसेना ही आघाडीबरोबर असून बंडखोराला तिचा अजिबात थारा नाही, असे या शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

पक्षनेतृत्वाला आव्हान देण्याची कलाटे यांची ही पहिलीच वेळ नाही. २०१९ च्या निवडणुकीत चिंचवडची जागा ही राष्ट्रवादीला सोडण्यात आली होती.त्यांनी तिथे उमेदवार दिला नव्हता. त्यावेळी कलाटेंनी बंडखोरी करीत ही निवडणूक ते अपक्ष लढले होते.तर,त्यानंतर २०२१ ला स्थायी समितीवर सदस्य नेमताना त्यांनी पक्षादेश डावलला होता.शेवटच्या वर्षाच्या कालावधीसाठी नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांची स्थायी समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यास पक्षनेतृत्वाने मुंबईहून गटनेते असलेल्या राहुल कलाटेंना (Rahul Kalate) आदेश त्यावेळी दिला होता.

Rahul Kalate, Nana Kate
Koregaon : वांगणा नदी पुलावरून महेश शिंदे, शशिकांत शिंदेंत रंगला श्रेयवाद

पण, त्यांनी तो डावलून स्वतची नेमणूक तिथे करून घेतली होती. ही शिफारस मावळचे शिवसेना (Shivsena) खासदार (आता शिंदे गटात) श्रीरंग बारणे यांनी पक्षाकडे केली होती. कारण त्यांचे उजवे हात समजले जाणारे पक्षाचे मावळ जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांच्या अश्विनी या पत्नी होत्या. ही संधी न मिळाल्याने त्यानंतर गजानन चिंचवडेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजप(BJP) मध्ये प्रवेश केला.

दरम्यान,त्यांचे अकाली निधन झाले.त्यानंतर त्यांच्या पत्नी नगरसेविका म्हणजे अश्विन चिंचवडे याही भाजपमध्ये गेल्या.दरम्य़ान,चिंचवडे प्रकरणानंतर कलाटे आणि खा.बारणेंतील संघर्ष टोकाला गेला.

Rahul Kalate, Nana Kate
Maharashtra News : महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून आता 'हे ' नाव चर्चेत; मोदी, शाहांचे विश्वासू म्हणून ओळख

२०१९ च्या बंडानंतर कलाटेंवर शिवसेनेने (त्यावेळी एकसंध) त्यावेळी कारवाई केली नव्हती.त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. त्यानंतर २०२१ ला त्यांनी पक्षादेश डावलूनही ती झाली नव्हती.त्यातून त्यांना पक्षाने एकप्रकारे दुर्लक्षित केल्याचे बोलले जात होते व आहे. दुसरीकडे खा.बारणे हे शिवसेना फुटल्यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेत (शिंदे गट) गेले आहेत.

दरम्यान,ठाकरे शिवसेना ही आघाडीबरोबर असल्याने काटेंच्या ऐतिहासिक विजयासाठी ती प्रयत्न करणार असल्याचे या शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक अॅड. सचिन भोसले यांनी या राजकीय घडामोडीवर बोलताना सांगितले. बंडखोराला अजिबात समर्थन व थारा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com