तोंडं लपवून बसण्यापेक्षा खुर्च्या सोडून घरी बसा : सुनील शेळकेंनी भाजप नगरसेवकांना सुनावले

सर्वच नगरसेवकांनी एकत्रित बसून विकास कामांचे नियोजन करावे
Sunil Shelke
Sunil ShelkeSarkarnama
Published on
Updated on

तळेगाव दाभाडे (जि. पुणे) : मावळ तालुक्यातील तळेगाव नगर परिषदेच्या आढावा बैठकीस सत्तारूढ भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह नगरसेवक अनुपस्थित होते. ही बैठक राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. भाजप लोकप्रतिनिधींच्या गैरहजेरीचा आमदार सुनील शेळके यांनी शेलक्या शब्दांत समाचार घेतला. कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन जनतेची कामे करता येत नसतील, तर तोंड लपवून बसण्यापेक्षा खुर्च्या सोडून घरी बसा,’’ असा हल्लाबोल त्यांनी केला. सर्वच नगरसेवकांनी एकत्रित बसून विकास कामांचे नियोजन करावे, असे आवाहन केले. (Sunil Shelke angry on BJP corporator who absent review meeting)

तळेगाव नगरपरिषदेमध्ये आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार शेळके होते. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी वैशाली भुजबळ, नंदकुमार खोत, डॉ. गुणेश बागडे, पोलिस निरीक्षक शहाजी पवार, मुख्याधिकारी सतीश दिघे, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीला सत्तारूढ भाजपच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवक, तर तळेगाव शहर विकास समिती व जनसेवेचे काही नगरसेवक गैरहजर होते.

Sunil Shelke
अनंत गिते त्यावेळी शरद पवारांच्या पाया पडले होते

सुरुवातीलाच भाजपचे सभागृह नेते अरुण भेगडे यांनी बैठक आयोजित करूनही पक्षाचे सर्वच नगरसेवक गैरहजर असल्याबद्दल आमदार शेळके यांनी हजेरी घेतली. शहराच्या विकासकामासाठी नगर परिषदेला सुमारे ३५ कोटी ८८ लाखांचा निधी वर्षभरापासून पडून असून, कामाला सुरुवात झाली नाही. याबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. शहरातील पाणीपुरवठा भुयारी गटार योजनांची कामे एकत्रित नियोजन करून संपवावीत, तरच रस्त्यांची कामे सुरू करता येतील. नगरसेवकांनी एकत्रित बसून, विकासकामांचे नियोजन करून प्रस्ताव पाठविले तर आपणाला निधी देता येईल, असे सांगितले.

Sunil Shelke
अण्णा-काकांची सत्ता असताना ‘माळेगाव’ची साखर गटारातून वाहत होती

तळेगाव शहरातील नागरिकांच्या लसीकरणासाठी दहा हजार लशी उपलब्ध करून देत असून, आरोग्य विभागाने याचे नियोजन करावे, असे आवाहनही शेळके यांनी केले. तळेगाव-चाकण महामार्गाच्या रुंदीकरणात येणारे विजेचे खांब काढणे, नगर परिषदेची नूतन इमारत बांधकाम, गॅस दाहिनी आदी कामे त्वरित हाती घेण्याबाबत मुख्याधिकारी दिघे यांना सूचना केल्या. तळेगाव गाव स्टेशन व चाकण रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करून रस्ते मोकळे करावेत, भाजी मंडईतच भाजी विक्रेत्यांची बसण्याची सोय करावी, अशा सूचना केल्या.

या वेळी विरोधी पक्षनेते गणेश काकडे, नगरसेवक संतोष भेगडे, अरुण माने, वैशाली दाभाडे, हेमलता खळदे, संगीता शेळके, मंगल भेगडे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com