Pimpri News : राष्ट्रवादीचे आमदार बनसोडेंच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? 'त्या' फोटोमुळे पुन्हा चर्चेत

Ncp Mla Anna Bansode News : चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार ऐनभरात आला असतानाच...
Anna Bansode
Anna Bansode Sarkarnama
Published on
Updated on

उत्तम कुटे

Pimpri Political News : पिंपरीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे हे पक्षाचे कार्यक्रम,बैठकांना अनेकदा दांडी मारत असल्याने ते पक्षात नाराज असल्याची व त्यातून ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा यापूर्वी झाली होती. तिचे त्यांनी त्यावेळी खंडनही केले होते. नंतर,थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मोटारीतूनत त्यांनी गेल्या महिन्यात तीस तारखेच्या रात्री मंत्रालय,मुंबई ते मुख्यमंत्र्यांचे खासगी निवासस्थान,ठाणे असा प्रवास केल्याने ते पुन्हा चर्चेत आले होते.

मतदारसंघातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मुख्यमंत्र्य़ाबरोबर त्यांच्या मोटारीतून प्रवास केल्याचा खुलासा आमदार अण्णा बनसोडेंनी त्याचदिवशी ठाण्यातून `सरकारनामा`शी बोलताना केला होता.आता चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार ऐनभरात आला असताना त्यांच्या नावाच्या चर्चेची हॅटट्रिकच झाली आहे. चर्चेला कारणही तसेच आहे.

ते आमदार असलेल्या राष्ट्रवादीचे कट्टर प्रतिस्पर्धी भाजपच्या चिंचवडमधील उमेदवार अश्विनी जगताप यांचे पती आणि ज्यांच्या निधनाने ही पोटनिवडणूक लागली ते चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्याबरोबरचा फोटो त्यांनी आपल्या व्हाटस अप डीपीवर ठेवला आहे

Anna Bansode
Mungantiwar : बहुमत म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती नाही, 'त्यांच्या' दावणीला बांधलेल्यांचा पक्ष कसा होईल?

या निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्यात असतानाही हा डीपी अद्याप तसाच आहे. त्यामुळे त्याची चर्चा झाली नसती,तर नवलच.त्यातून ते पुन्हा भाजपमध्ये जाणार अशी आवई पुन्हा उठली. दरम्यान,डीपीवरील स्व.आ. जगतापांबरोबरच्या आपल्या फोटोसंदर्भात खुलासा करताना आमची ही राजकारणापलिकडील मैत्री असल्याचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

anna bansode
anna bansodeSarkarnama
Anna Bansode
Supreme Court hearing : कपिल सिब्बलांच्या युक्तीवादावर न्यायमूर्तींची टिप्पणी; न्यायालयात महत्त्वाची घडामोड

पहिल्यांदा नगरसेवक व आमदार होताना लक्ष्मणभाऊंनी मला मोठी मदत केली होती,असा कृतज्ञतापूर्वक उल्लेख त्यांनी केला. तसेच पक्षाशी प्रामाणिक असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. आमचे उमेदवार नाना काटे हे निवडून येण्यासाठी आमचे नेते अजित पवार यांच्याबरोबर समाजबांधवांची पिंपरी कॅम्पात सिंधी बैठक घेतली याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com