Political Horoscope: भारत-पाकिस्तानातील प्रमुखांचे वाक्‌युद्ध रंगणार; सीमेवर पुन्हा युद्धजन्य स्थिती?

India Pakistan operation-sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत भारताची भूमिका परदेशातील महत्त्वाच्या देशांना पटवून देण्यात भारताला मोठे यश मिळेल. दहशतवाद्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेला अनेक देशांचा पाठिंबा मिळेल.
India Vs Pakistan | Operation Sindoor
India Vs Pakistan | Operation SindoorSarkarnama
Published on
Updated on

सिद्धेश्वर मारटकर

दि. २७ मेच्या अमांत कुंडलीमध्ये मिथुन लग्न उदित असून, व्ययस्थानात रोहिणी नक्षत्रात अमावस्या होत आहे. सोबत बुध-हर्षल युती झाली असून, लग्नी गुरू, धनस्थानी मंगळ, अष्टमात प्लुटो व दशमात राहू, नेपच्यून, शनी, शुक्र अशी ग्रहस्थिती आहे.

ग्रहस्थितीचा विचार करता या काळात देशातील महत्त्वाच्या नेत्यांचे परदेश दौरे यशस्वी होतील. ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत भारताची भूमिका परदेशातील महत्त्वाच्या देशांना पटवून देण्यात भारताला मोठे यश मिळेल. दहशतवाद्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेला अनेक देशांचा पाठिंबा मिळेल. यावरून पाकिस्तान थयथयाट करेल आणि चोराच्या उलट्या बोंबा अशी स्थिती निर्माण होईल.

भारत-पाकिस्तानातील प्रमुखांचे; तसेच महत्त्वाच्या नेत्याचे वाक्‌युद्ध रंगतील. वादग्रस्त वक्तव्यांमुळे मोठे नेते अडचणीत येतील. गुरू-शनी केंद्र योगामुळे मंदिरे, धार्मिक व्यक्ती, महत्त्वाच्या व्यक्ती, इमारती यांना धोका संभवतो. या योगामुळे जातीय, धार्मिक वादविवाद होण्याची शक्यता असून, जातीय आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येईल.

पुढील काळात शनी-मंगळ षडाष्टक योग होत असल्यामुळे पोलिस, लष्कराला मोठी दक्षता घ्यावी लागेल. दहशतवादी, माओवादी संघटनांकडून हिंसाचार, स्फोट घडविण्याचे प्रयत्न होतील. गुन्हेगारीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असून, पोलिस, लष्कराच्या कारवाईत मोठे दहशतवादी, माओवादी ठार मारले जातील किंवा पकडले जातील.

या काळात पाकिस्तानशी होणारी चर्चा निष्फळ ठरण्याची शक्यता असून, दोन्ही देशांत पुन्हा तणावपूर्ण स्थिती निर्माण होऊ शकते. पुढील काळात सीमेवर पुन्हा युद्धजन्य स्थिती निर्माण होईल. भारताच्या कुटनीतीमुळे पाकिस्तानची अस्वस्थता वाढेल, सिंधू नदीच्या पाण्यावरून मतभेद वाढतील. पाकव्याप्त काश्मीरवरून भारत आक्रमक होईल. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याची शक्यता असून, देशातील प्रमुख ठिकाणी घातपात घडविण्याचे प्रयत्न होतील.

India Vs Pakistan | Operation Sindoor
Vaishnavi Hagavne : हगवणेंच्या सुनांवर निलेश चव्हाणचीही दादागिरी...बाळही होते त्याच्याकडेच; मोठ्या सुनेनं सांगितली छळाची कहाणी

या काळात मोठे भूकंप, वादळे, अवकाळी पाऊस यांमूळे मोठे नुकसान होऊन जनजीवन विस्कळित होईल. बुध-हर्षल युतीमुळे मोठी वादळे होतील. या योगामुळे मोठी विमान दुर्घटना संभवते. या योगामुळे शेअर मार्केटमध्ये मोठे चढउतार होऊन मार्केट अस्थिर राहील. गुतवणूकदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता राहील. मार्केट विक्रमी पातळी गाठून पुन्हा मोठे करेक्शन येईल. सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण होईल.

तसेच, शनी-मंगळ कुयोगामुळे मोठे खेळाडू निवृत्ती घेतील. मोठ्या स्पर्धा पूर्ण होणे कठीण राहील. खेळाडूंच्या दुखापती, वादविवाद याकाळात संभवतात, मोठ्या खेळाडूच्या अपघात किंवा घातपाताची घटना या काळात संभवते. या योगामुळे पोलिस, लष्करावर हल्ले होण्याची शक्यता असून, शत्रूराष्ट्राच्या सैन्याची मोठी हानी या काळात संभवते.

व्ययस्थानातील अमावस्या प्रमुख व्यक्तींसाठी प्रतिकूल असून, राजकीय, धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तीच्या निधनाच्या घटना या काळात संभवतात. मोठ्या व्यक्तींचा अपघात, घातपात, तुरुंगवास यांसारख्या घटना अनुभवास येतील. दशमातील उच्च राशीतील शुक्रामुळे स्त्रीवर्गाला मोठा अधिकार, मानसन्मान मिळेल.

महिला आरक्षणातील टक्केवारीवर चर्चा होईल. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महिलांचे प्रमाण मोठे राहील. कलाकारांना पुढील काळ आव्हानात्मक असून, एखाद्या मोठ्या कलाकाराचा मृत्यू होऊ शकतो. तसेच, काही चित्रपटांवरून मोठे कलाकार अडचणीत येऊ शकतात.

India Vs Pakistan | Operation Sindoor
Jyoti Malhotra: You Tuber ज्योतीकडून मुंबईची रेकी; 'लालबागचा राजा'सह महत्वाच्या ठिकाणांचे Video काढले...

साप्ताहिक राशिभविष्य २४ ते ३० मे २०२५

मेष : धनस्थानी होणारी अमावस्या अनपेक्षित खर्च करणारी राहील. स्पष्ट बोलणे टाळावे. कुटुंबात वादविवाद संभवतात. धार्मिक, मंगल कार्यात सहभाग राहील.

वृषभ : मोठे खर्च पुढील काळात संभवतात. राशीतील बुध-हर्षल युती मूड बदलणारी असेल. उत्स्फूर्त वक्तव्यामुळे कौतुक होईल. कुटुंबात आनंददायी घटना घडेल.

मिथुन : परदेशगमनाची संधी मिळेल. उत्तरार्धात चंद्र-गुरू युतीमुळे मानसिक स्थिती चांगली राहील. विद्यार्थांना अपेक्षित यश मिळेल. नवीन मित्र-मैत्रिणी भेटतील. मोठे लाभ होतील.

कर्क : जुनी येणी वसूल होईल. नोकरी आणि व्यवसायात मनासारखे बदल होतील. सामाजिक, राजकीय क्षेत्रांत मोठे यश मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होतील.

सिंह : दशमात होणारी अमावस्या नोकरी व्यवसायात अनपेक्षित बदल घडविणारी राहील. नवीन नोकरी-व्यवसायाची संधी मिळेल. बोलल्यामुळे प्रभाव वाढेल. बदली किंवा प्रमोशन होईल.

कन्या : विद्यार्थ्यांना प्रवेश मिळविण्यात अडथळे येतील. आधुनिक शिक्षणाकडे कल राहील. सामाजिक-राजकीय क्षेत्रात मोठे यश मिळेल. चांगल्या कामांसाठी वरिष्ठांकडून संधी मिळेल.

तूळ : शारीरीक-मानसिक दगदग होईल. कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल. उत्तरार्धातील चंद्र-गुरू युती दिलासा देणारी राहील. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद मिळेल.

वृश्चिक : वैवाहिक जीवनात मोठ्या घडामोडी घडविणारा कालखंड आहे. जोडीदाराशी मतभेद टाळावेत. मात्र, अष्टमातील चंद्र-गुरू युती मोठे आर्थिक लाभ देणारी राहील.

धनू : हाताखालच्या लोकांकडून मनस्ताप संभवतो. सप्तमातील चंद्र-गुरू युती विवाह इच्छुकांचे विवाह जमविणारी राहील. कोर्टकचेरीच्या कामांमध्ये मोठे यश मिळेल. भागीदारीच्या व्यवसायात फायदा होईल.नवीन घर, वाहन खरेदी होईल.

मकर : आधुनिक शिक्षणाकडे कल राहील. शेअर मार्केटपासून दूर राहावे. षष्टातील चंद्र-गुरू युती हितशत्रूंचा त्रास वाढविणारी राहील. या काळात नोकरीमध्ये मोठा बदल संभवतो.

कुंभ : घर, प्रॉपर्टी जागेसंदर्भातील कामे मार्गी लागतील. नोकरीत बदल किंवा बदली संभवते. घरातील वातावरण व मन अस्थिर राहील.

मीन : तृतीय स्थानात होणारी अमावस्या कर्तृत्व, पराक्रम सिद्ध करणारी राहील. मोठे धाडसी निर्णय यशस्वी होतील. चतुर्थातील चंद्र-गुरू युती नवीन घर किंवा वाहन खरेदीसाठी उत्तम राहील

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com