Nashik ACB News : धक्कादायक, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे लाच प्रकरणात अडकले, तर महिला अधिकाऱ्याला अटक

Nashik Bribery Case : नाशिकच्या प्रसिद्ध आणि इतिहासात गाजलेल्या लढाईचा संदर्भ असलेल्या रामशेज किल्ल्याशी संबंधित हे प्रकरण आहे.
Tejas Garge | Aarti Aley
Tejas Garge | Aarti Aley Sarkarnama

Nashik Bribery News, 10 May : सामान्यता नागरिकांचा संबंध न येणाऱ्या पुरातत्त्व विभागाचे पितळ गुरूवारी ( 9 May ) उघडे पडले. या विभागाच्या महिला अधिकाऱ्याने एका प्रकरणात लाच स्वीकारली आहे. संबंधितांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

अनेक वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत असलेल्या पुरातत्त्व विभागाच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगण्यासारखा प्रकार उघड झाला आहे. या विभागात कार्यरत सहाय्यक संचालक महिला अधिकाऱ्याने एका प्रकरणात लाच स्वीकारली आहे. लाच स्वीकारण्यासाठी महिला अधिकाऱ्याला संचालक तेजस मदन गर्गे यांनी प्रोत्साहन दिल्याचं सांगितलं जात आहे.

नाशिकच्या प्रसिद्ध आणि इतिहासात गाजलेल्या लढाईचा संदर्भ असलेल्या रामशेज किल्ल्याशी संबंधित हे प्रकरण आहे. रामशेज नजीक एव्हरग्रीन कंपनीने अकरा वर्षाच्या कराराने जमीन घेतली होती. या संदर्भात पुरातत्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. त्यामुळे या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुरातत्त्व विभागाशी संपर्क केला होता. मात्र, त्यांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने ते त्रस्त झाले होते, त्यातूनच लाचेचे प्रकरण घडले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर आणि त्यांच्या पथकाने इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुरातत्त्व विभागाच्या सहाय्यक संचालक आरती मृणाल आळे यांनी एव्हरग्रीन कंपनीकडे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागितली होती.

संबंधितांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर या प्रकरणाची पडताळणी करण्यात आली. लाललुचपत विभागाकडून टाकलेल्या सापळ्यात आळे लाच घेताना आढळल्या. आळे यांना लाच घेण्यासाठी संचालक तेजस मदन गर्गे यांनी प्रोत्साहन दिले.

Tejas Garge | Aarti Aley
Code of Conduct Violations News : बारामती लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या तक्रारींचा पाऊस !

याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आळे यांची चौकशी सुरू आहे. याबाबत लवकरच संचालक तेजस गर्गे यांनाही चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे. आळे सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात आहेत. पुरातत्व विभागासारख्या महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक वास्तूंशी संबंध असलेल्या विभागातही लाचखोरीचे प्रकरण घडल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.


( Edited By : Akshay Sabale )

Tejas Garge | Aarti Aley
Jalna News: काय सांगता? आरोग्य कॅम्पसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनेच घेतली लाच

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com