Jalna News: काय सांगता? आरोग्य कॅम्पसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनेच घेतली लाच

Aurangabad Anti-corruption Department: आरोग्य कॅम्प घेण्यासाठी प्रत्येक कॅम्पचे एक हजार रुपयांप्रमाणे 25 कॅम्प साठी 25 हजारांची मागणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी आणि कनिष्ठ लिपिकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Anti Corruption News
Anti Corruption News Sarkarnama

Jalna News : जालना जिल्ह्यातील एका घटनेमुळे आरोग्य विभागात (Department of Health) खळबळ उडाली आहे. कारण अबंड येथील उपजिल्हा रुग्णालयांच्या आवारात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक औरंगाबाद विभागाच्या (Aurangabad Anti-Corruption Division) पोलिसांनी अटक केली आहे. आरोग्य कॅम्पसाठी 20 हजार रुपये घेताना त्यांना रंगेहात अटक केली आहे. डॉ. शामकांत दत्तात्रय गावंडे आणि पंडित भीमराव कळकुंबे असं अटक करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी आणि कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे.

आरोग्य कॅम्प (Health Camp) घेण्यासाठी प्रत्येक कॅम्पचे एक हजार रुपयांप्रमाणे 25 कॅम्प साठी 25 हजारांची मागणी या दोघांनी केली होती. तडजोडी अंती 20 हजाराची लाच घेताना या दोघांना अंबड शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात रंगेहाथ ताब्यात घेण्यात आलं आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यानेच लाच घेतल्यामुळे विश्वास ठेवायचा कोणावर असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्राथमिक आरोग्य केंद्र, वडीगोद्री आणि जामखेड केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडेच लाच मागितल्याने एकच खबळ उडाली आहे. तक्रारदाराने त्यांच्या आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये मानव विकास अंतर्गत घेतलेल्या आरोग्य शिबिराची बिले पडताळणी करून मंजुरी करिता पंचायत समिती अंबड, जालना (Jalna) येथे पाठविली होती. आरोग्य अधिकारीच लाच मागत असल्याने दाद मागायची कुणाकडे म्हणून या वैद्यकीय अधिकाऱ्याने औरंगाबाद (Aurangabad) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Anti Corruption News
Demonetisation News : नोटबंदी म्हणजे काळा पैशाचं रुपांतर पांढऱ्या पैशात करण्याचं चांगलं मार्ग... ; सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचं मत!

या घटनेने आरोग्य विभागतील लाचखोरीपणा समोर आला असून अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, लाच घेतल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी आणि कनिष्ठ लिपक यांना अटक केली असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणाचा अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस (Police) करत आहेत.

(Edited By Jagdish Patil)

Anti Corruption News
Lok Sabha Election 2024 : धामधूम लोकसभा निवडणुकीची; चर्चा मात्र 'ड्राय डे'ची

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com