Deepak Kesarkar News: शिक्षण विभागाचा अजब कारभार समोर आला आहे. शिक्षण सेवकांची तीन वर्षांची सेवा झाल्यावर त्यांची पुन्हा परिषदेकडून परीक्षा घेण्याचा घाट घातला आहे. त्यानंतर सेवकांना सेवेत कायम करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. केसरकरांच्या खात्यानं घेतलेल्या निर्णयानंतर शिक्षक सेवकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांचा तुटवडा होता. त्यामुळे एकूण 21हजार 678 रिक्त पदांसाठी भरती काढण्यात आली होती. ही सर्व प्रक्रिया पवित्र पोर्टमार्फत करण्यात आली होती. यात जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित शाळांचा समावेश होता. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागानं 11 हजार 86 शिक्षकांची भरती केली.
मात्र, शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयानं सेवकांचं 'टेन्शन' वाढलं आहे. कारण, पवित्र पोर्टलमार्फत भरती केलेल्या शिक्षण सेवकांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र परीक्षा परिषदेमार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेनंतर त्यांची सेवा काय करण्यात येणार आहे. त्यामुळे 'टीईटी' अथवा 'टेट' पवित्र पोर्टलमार्फत भरती झालेल्या शिक्षक सेवकांना नोकरी वाचविण्यासाठी पुन्हा आणखी एका अग्नि परीक्षेला समोरे जावे लागणार आहे.
कुशल अभियोग्यता प्राप्त केलेल्या शिक्षकांना अल्प मानधनावर काम करावे लागत आहे. यातच आता सेवाप्रवेश नियमानुसार मराठी माध्यमातून व्यावसायिक अर्हता धारण सेवकांना नियुक्तीनंतर प्रादेशिक भाषा परीक्षा ( मराठी आणि हिंदी भाषा ) संगणक परीक्षा द्यावी लागणार आहे.
इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक अर्हात धारण केलेल्यांना नियुक्तीनंतर शिक्षण सेवक कालावधीत राज्य शैक्षणिक संसोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्या अधिनस्थ संस्थेकडून घेण्यात येणारी कौशल्य चाणी उत्तीर्ण व्हावं लागणार आहे. जे उमेदवार त्यांच्या सेवेचा राजीनामा देऊ इच्छितात त्यांना शासन निर्णयानुसार किमान एक महिन्याची पूर्वसूचना देणं अथवा एका महिन्याचे वेतन शासनाकडे जमा करावे लागेल.
याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे म्हणाले, "शिक्षक सेवकांची परीक्षा घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली आहे. पण, परीक्षेचे आयोजन आम्ही करायचे की 'एससीईआरटी'नं करायचे? परीक्षा नेमकी कशी घ्यायची? याबद्दल अजून अंतिम निर्णय झाला नाही. त्यासंदर्भात रीतसर परिपत्रक येईल."
केसकरांच्या (Deepak Keskar) खात्यानं घेतलेल्या निर्णयावर शिक्षक सेवक संतोष मगर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. "इयत्ता दहावी, बारावी, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, नेट-सेट, पीएचडी, डीएड, बीएड, टीईटी, सीटीईटी, टेट एवढ्या परीक्षा पास झाल्यानंतर अभियोग्यता चाचणी दिल्यानंतर शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. त्यातही सुरवातीचे तीन वर्षे केवळ 16 ते 18 हजार रुपये मानधन दिले जात आहे. त्यातही तीन वर्षांनंतर पुन्हा एका परीक्षेला सामोरे जायचे का? अजून किती परीक्षा द्यायच्या हे शासनाने स्पष्ट करावे?" असा सवाल संतोष मगर यांनी उपस्थित केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.