Akola Loksabha : 18 तास उलटून मतदानाच्या अंतिम टक्केवारीची प्रतीक्षाच

Loksabha Election Voting : लोकसभेसाठी मतदान होऊन जवळपास 18 तासांचा कालावधी उलटला तरी मतदानाची टक्केवारी अद्याप अकोला जिल्हा प्रशासनाकडून जाहीर झाली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांचे नेमके चाललेय तरी काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी (ता.26) पार पडले. या टप्प्यात महाराष्ट्रातील Maharashtra विदर्भ आणि मराठवाड्यातील आठ जागांचा समावेश होता. गेल्या वर्षीपेक्षा यंदा मतदान कमी झाल्याचा अंदाज आहे. सरासरी 59 टक्के महाराष्ट्रात मतदान झाले. सायंकाळी उशिरा मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. अकोला मतदारसंघात मतदान होऊन तब्बल 18 तास उलटले तरी मतदानाची अंतिम टक्केवारी समजू शकली नाही.

Lok Sabha Election 2024
Nanded Lok Sabha Constituency : चिखलीकर-चव्हाण जोडीला महाविकास आघाडीचा 'दे धक्का'?

लोकसभेसाठी Loksabha Election मतदान होऊन जवळपास 18 तासांचा कालावधी उलटला तरी मतदानाची टक्केवारी अद्याप अकोला जिल्हा प्रशासनाकडून जाहीर झाली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांचे नेमके चाललेय तरी काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अकोला लोकसभा निवडणूक विभागाचे सामान्य निरीक्षक रामप्रतापसिंग जाडोन यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अकोला मतदारसंघात Akola loksabha constituency शुक्रवारी (ता.26) सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीमध्ये मतदान पार पडले. प्रशासनाने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत किती टक्के मतदान झाले याची तीनदा आकडेवारी जाहीर झाली. पण ही आकडेवारी अंतिम नसून आणखी दोन तास लागू शकतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी पाचपर्यंत 52.69 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले.

रात्री 8 वाजता परत आकडेवारी जाहीर झाली. त्यात 58 टक्के मतदान झाल्याचे सांगितले. त्यानंतर आज (शनिवारी) सकाळी परत वोटर टर्नआउट ॲपवर 61.79 टक्के मतदान झाल्याचे दिसत आहे. शिवाय जिल्हा माहिती कार्यालयानेसुद्धा तीच आकडेवारी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

जिल्हा प्रशासनातील अधिकारी आकडेवारी बोलायला तयार नाहीत. आणखी एक दोन तास अंतिम आकडेवारीसाठी लागू शकतात असे सांगण्यात आले. निवडणूक विभागाचे सामान्य निरीक्षक रामप्रतापसिंग जाडोन अकोल्यात आहेत. असे असतानाही 18 तास उलटले तरी मतदानाची टक्केवारी जाहीर न होणे ही चिंतेची बाब आहे.

(Edited By Roshan More)

R

Lok Sabha Election 2024
Abhijeet Patil Group Meeting : ‘विठ्ठल’वरील कारवाईनंतर अभिजित पाटलांनी बोलावली समर्थकांची बैठक; निर्णयाकडे लक्ष

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com