Akot Police Crime : अकोट पोलिस ठाण्यातील मृत्यूप्रकरणी मोठी कारवाई; ठाणेदार कोल्हे यांची अखेर उचलबांगडी

Amaravati Police Department : माळवेंकडे अकोट पोलिस स्टेशनचा पदभार, आयपीएस मित्तल यांचीही होणार चौकशी!
Akot Police Crime News
Akot Police Crime NewsSarkarnama
Published on
Updated on

Akola Crime News : अकोट पोलिस स्टेशनमध्ये संशयित आरोपी म्हणून अटक केलेल्या गोवर्धन हरमकारच्या मृत्यू प्रकरणाने पोलिसांची चांगलीच नाचक्की झाली आहे. या प्रकरणात चुपी साधून बसलेल्या ठाणेदार तपन कोल्हे यांची अखेर उचलबांगडी करीत कंट्रोल रूम अटॅच करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर अमोल माळवे यांना तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी 'सकाळ' वृत्तसमुहाने पाठपुरावा केला. याची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी कारवाई केली आहे. 

अकोट शहराचे पीएसआय राजेश जवरे आणि इतर पाच पोलिस कर्मचाऱ्यांनी मोबाईल चोरीच्या संशयातून १५ जानेवारी रोजी गोवर्धनला अटक केली होती. त्यानंतर १६ जानेवारीला सुकळी गावात आणत घर झडती घेतली. गोवर्धनसह तक्रारदार सुखदेव यांनाही ताब्यात घेतले होते. १६ जानेवारीला रात्री आठ ते नऊ वाजता दोघांनाही पोलिस ठाण्यात आणले. याठिकाणी दोघांनाही अमानुषपणे मारहाण केली. यामध्ये दोघेही जखमी झाले. दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ जानेवारीला गोवर्धनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

अकोट पोलिस ठाण्यात गोवर्धनच्या मृत्यू प्रकरणानंतर मनीष कुलट, विशाल हिवरे, सागर मोरे, पंचांग, सदांशिव हे कर्मचारी घटनेपासून हजर झाले नाही. याबाबत शहराचे ठाणेदार तपन कोल्हे यांनीही ते गायब असल्याबाबत वरिष्ठांना माहिती दिली नाही. तसेच त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला नाही. घटनेनंतर २० दिवस उलटले तरी हे कर्मचारी गायब होते, ते कुठे आहेत हे अकोट पोलिसांकडून दडपण्यात आल्याची चर्चा होती.

यातून पोलिस अधीक्षकांनी ठाणेदार तपन कोल्हे यांच्या कार्यावर शंका उपस्थित करीत त्यांना हेडक्वार्टर अटॅच केले आहे. आता या प्रकरणात उपनिरीक्षक राजेश जवरे, कॉन्स्टेबल चंद्रप्रकाश सोळंके यांच्यासोबतच ठाणेदार तपन कोल्हे यांचे नावही जोडले गेले आहे. आता त्यांच्यावर पोलिस प्रशासन काय कारवाई करणार, याकडे लक्ष आहे.

Akot Police Crime News
Ajit Pawar Vs Amol Kolhe : नट, नाटककार, अभिनेता...; भर पावसात अजितदादांनी अमोल कोल्हेंना धू धू धुतलं

दरम्यान, अकोट पोलिस ठाण्यातील गायब पाच पोलिस कर्मचारी दोन दिवसांत हजर होण्याची शक्यता असून ते प्रकरण ठाणेदार तपन कोल्हे यांच्यावरही शेकण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत अमरावतीचे सीआयडी विभागाचे पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी, गोवर्धनच्या मृत्यू प्रकरणाचा सीआयडीकडून योग्य मार्गाने तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एचडीपीओ मित्तल यांचीही चौकशी व्हावी! 

सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा अकोट उपविभागाचे पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांचीही या प्रकरणात चौकशी करण्याची गरज आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील पोलिस ठाण्यात एका संशयित आरोपीचा मृत्यू होतो, त्याच पोलिस ठाण्यातील पाच पोलिस कर्मचारी काही दिवसांपासून गायब असतात. ठाणेदार तपन कोल्हे काही बोलत नाहीत. हा सर्व प्रकार माहिती असतानाही एसडीपीओ अनमोल मित्तल यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप गोवर्धनच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे आयपीएस मितल यांचीही सीआयडीने चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Akot Police Crime News
Ajit Pawar Chakan Sabha : प्रचार संपण्याआधीच अजितदादांना 'ती' चूक मान्य; शिरूरकरांना म्हणाले, 'आढळरावांना...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com