Shirur Political News : शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवडून आणण्यासाठी आणि महाविकास आघाडीचे अमोल कोल्हेंना पराभूत करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठी ताकद लावली आहे. यातूनच त्यांनी भर पावसात चाकण येथे आढळराव पाटलांसाठी प्रचाराची सांगता सभा घेतली. यावेळी त्यांनी गतवेळीची कोल्हेंना निवडून आणण्याची चूक जाहीरपणे मान्य केली. आता ती चूक सुधारावी आणि आढळरावांना निवडून आणावे, असे आवाहन पवारांनी शिरूरकरांना केले.
शिरूरसाठी 13 मे रोजी मतदान होत आहे. त्यानुसार शनिवारी (ता. 11) या मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. आढळरावांसाठी Shivajirao Adhalrao Patil घेतलेल्या सांगता सभेत अजित पवार म्हणाले, पाच वर्षांपूर्वी कोल्हेंना मुंबईत बोलावून लोकसभेची उमेदवारी दिली. मला वाटले होते की ते चांगले काम करतील. मात्र त्यांनी माझी अपेक्षा फोल ठरवली. माझी चूक झाली. मी चुकलो, मला माझी चूक मान्य आहे. आता ती चूक सुधारा आणि आढळरावांना निवडून द्या, असे अजितदादांनी आवाहन केले.
अजित पवारांनी Ajit Pawar शिरूर लोकसभा मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा शब्द दिला आहे. ते म्हणाले, तुमच्या भागातील कलमोडीच्या प्रश्नावर आमदार दिलीपराव मोहिते पाटीव, दिलीप वळसे पाटील आणि मी एकत्रित बसून तोडगा काढला आहे. तुमच्या तालुक्यातील सर्व गावे ओलीताखाली आणण्याची जबाबदारी माझी आहे. तसेच आंबेगावाला कशी मदत होईल, याबाबतही माझे प्रयत्न सुरूच आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जलसंपदा खते तर माझ्याकडे अर्थखाते आहे. आम्ही दोघे मिळून येथील प्रलंबित कामे मार्गी लावू, असे आश्वासनही पवारांनी यावेळी दिले.
1972 च्या दुष्काळात चासकमानचा कालवा तयार करण्यात आला. आता मात्र त्या कालव्याची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. ही गळती थांबवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून कालव्याचे लाईनिंग केले जाईल. हे करताना माझ्यावर राज्याचा उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तेराही तालुक्यांचा विकास करण्याची जबाबदारी आहे, असेही अजित पवारांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्यात कांद्याचा प्रश्न गाजत आहे. मात्र याबाबत पंतप्रधान नरेंद्रे मोदींसोबत Narendra Modi चर्चा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, बीड, पुणे, नगर, नाशिकमध्ये जास्त कांदा होतो. काहीही करा निर्यात बंदी उठवला, असे मंत्रिमंडळातील अनेकांची मागणी होती. कांद्याचा भाव हा आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. याबाबत रेसकोर्टच्या सभेत पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. कांद्याच्या निर्यातबंदीमुळे शेतकरी नाराज आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोसळले आहे. याची जाणीव करून दिल्यानंतर मोदींनी कांद्यावरील निर्यातबंदी उठवली आहे. आता कांदा निर्यात होत आहे, याकडेही पवारांनी लक्ष वेधले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.