Beed teachers suspension : बीड जिल्हा परिषदेचे १४ शिक्षक निलंबित; 'या' कारणामुळे केली सीईओने कारवाई

CEO action Beed Zilla Parishad News : बीड जिल्हा परिषदेतील शिक्षकांसह काही कर्मचाऱ्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.
Beed ZP Election News
Beed ZP Election NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed News : बीड जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. ज्या कर्मचाऱ्यांनी निर्धारित वेळेत यूआयडी (Unique ID) आणि प्रमाणपत्र जमा केले नाही, त्यांच्याविरुद्ध टप्प्याटप्प्याने कारवाई केली जात आहे. त्यानुसार बीड जिल्हा परिषदेतील शिक्षकांसह काही कर्मचाऱ्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी गुरुवारी दोषी आढळलेल्या 14 शिक्षकावर निलंबनाची कारवाई केली आहे.

बीड जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना दिव्यांगाचे युडीआयडीकार्ड वेळेत सादर न केल्याने कारवाई करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या दिव्यांग विभागाचे मुख्य सचिव तुकाराम मुंडे यांनी विविध विभागात कार्यरत असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. या आदेशानुसार आता कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. बीड जिल्हा परिषदेच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे.

Beed ZP Election News
Chandrakant Patil : निवडणूक आयोगाच्या आधीच चंद्रकांत पाटलांनी जाहीर केली महापालिका निवडणुकांची तारीख? युतीबाबत दिले संकेत

जिल्हा परीषदेत कार्यरत असलेल्या ज्या कर्मचाऱ्यानी निर्धारित वेळेत यूआयडी प्रमाणपत्र जमा केले नाही. त्यांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी बुधवारी चार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. त्यानंतर गुरुवारी ही 14 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. जिल्हा परिषदेच्या अन्य विभागातील कर्मचाऱ्यांची ही चौकशी केली जात आहे ज्यामध्ये 100 पेक्षा अधिक शिक्षक (Teacher) व कर्मचाऱ्यांकडील दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी केली जात आहे.

Beed ZP Election News
Shivsena UBT : 'केंद्रीय कृषिमंत्र्यांमुळे महायुतीचं पितळ उघडं पडलं, निवडणुकांसाठी पायाला भिंगरी लावून फिरले, पण शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत...'

दिव्यांग प्रमाणपत्र सादर न केलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेमधील चौकशी समितीने आरोग्य विभागातील 11 कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची तपासणी करून चौकशी सुरू केली आहे. यामधील तीन कर्मचाऱ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर न केल्याने तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यासोबतच काही कर्मचाऱ्यांना निलंबित का करण्यात येऊ नये? अशा प्रकारची नोटीस बजवण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची चौकशी मुंबई येथील जे. जे. हॉस्पिटलच्या समितीकडून करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान या कारवाईमुळे शिक्षकांत खळबळ उडाली आहे.

Beed ZP Election News
BJP Vs Shivsena : फोडाफोडीनंतर शिवसेनेच्या टार्गेटवर रवींद्र चव्हाण; एकनाथ शिंदेंपाठोपाठ मंत्री, आमदार अन् पदाधिकारी तुटून पडलेत

निलंबित करण्यात आलेल्या शिक्षकाची नावे पुढीलप्रमाणे : रवींद्र जाधव, उषा माने, रामचंद्र भोसले, कल्पना चोपडे, हेमंत शिनगारे , संजीवनी कंठाले, नवाज सय्यद, अंजली मुंडे, शैला देवगुडे, मनोज सूर्यवंशी, अश्रुबा भोसले, सिद्धू वाटमांड, प्रकाश भोसले, सुनंदा भोईर अशी जिल्हा परिषदेच्या निलंबित करण्यात आलेल्या शिक्षकांची नावे आहेत तर द्वारका जाधव, चंद्रकांत सुनील कुलकर्णी, विष्णू निर्मळ, भीमसेन प्रभू हे अन्य विभागातील चार कर्मचाऱ्यांना ही निलंबित करण्यात आले आहे.

Beed ZP Election News
NCP Sharad Pawar : पुणे जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 'नो इंटरेस्ट'; 'तुतारी'वाला माणूस मतपत्रिकेवरून गायब?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com