Chandrakant Patil : निवडणूक आयोगाच्या आधीच चंद्रकांत पाटलांनी जाहीर केली महापालिका निवडणुकांची तारीख? युतीबाबत दिले संकेत

Chandrakant Patil On Municipal Elections : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून आता मतमोजणी आणि निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका निवडणुकींबाबत मोठं भाष्य केलं आहे.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. पिंपरी-चिंचवडमधील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी २० ते २२ डिसेंबरदरम्यान महापालिकेची आचारसंहिता लागू होण्याचा दावा केला.

  2. इतर पक्षातील माजी नगरसेवक भाजपमध्ये येऊ इच्छित असतील, तर त्यांच्या नावावर गाभा समितीचे एकमत होईल, असे त्यांनी सांगितले.

  3. महापालिका निवडणूक युतीतून लढविण्याचा प्रयत्न होईल आणि युती न झाल्यास मित्रपक्षांवर टीका करू नये, असे फडणवीसांचे निर्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.

Pune News : राज्यातल्या 264 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकींसाठी मतदान पार पडलं असून आता उत्सुकता ही निकालाची आहे. मतमोजणी ही 21 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या दरम्यान आता राज्यातल्या महापालिका निवडणुकांची आचारसंहिता कधी लागणार यासह राज्यात युती होणार की त्याही स्वतंत्र लढल्या जाणार याबाबत मोठे वक्तव्य भाजप नेते, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. यामुळे आता लवकरच महापालिका निवडणुकांच्या निवडणुकींचा धुरळा उडणार असल्याचे समोर येत आहे.

महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता डिसेंबर महिन्यात लागण्याची शक्यता वर्तवली जात असून राजकीय घडामोडींनी आता वेग आला आहे. तसेच आता महापालिका प्रशासनाची ही लगबग सुरु झाली आहे. याचदरम्यान आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांची (गुरुवारी) पिंपळेसौदागर येथे बैठक घेत महत्वाच्या सूचना दिल्या. तसेच त्यांनी महापालिका निवडणुकीसाठी 20 किंवा 22 डिसेंबरला आचारसंहिता लागेल, असा दावा केला आहे.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी, पिंपरी-चिंचवड शहरातील इतर पक्षामधील माजी नगरसेवकांची भाजपमध्ये येण्याची इच्छा आहे. मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होणार आहे. पण त्याअगोदर त्यांच्या नावावर स्थानिक गाभा समिती (कोअर कमिटी) काम करेल. आणि त्यानंतर जी नावे फायनल होतील ती पुढे प्रदेश कमिटीकडे पाठवली जातील. तशी नावे एकत्र केली जात असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.

Chandrakant Patil
Raksha Kdhase यांचा Chandrakant Patil यांच्यावर आरोप , मतदान केंद्राबाहेरच राडा ।Muktainagar News।

तर यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी निश्चितीबाबत चर्चा झाली असून 20 किंवा 22 डिसेंबरला महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागेल. त्यामुळे जो पक्षाकडे अर्ज मागेल त्यांना आतापासूनच उमेदवारी अर्ज दिला जाईल.त्यानंतर पुढच्या चार दिवसात ते अर्ज भरुन घेतले जातील.

मात्र अर्ज जमा कराताना कोणीही शक्तीप्रदर्शन करू नये. इच्छुकाने स्वत: पक्ष कार्यालयात येऊन तो अर्ज दाखल करायचा आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्या अर्जांची छाननी केली जाईल. यानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठविले जातील, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी, फक्त अर्ज घेतला, तो भरला म्हणजे नाही. तर एका एका खासगी संस्थेच्या माध्यमातून प्रत्येकाचा सर्व्हे करण्यात येणार असून या सर्व्हेत कोणाचे नाव पुढे येईल त्यानुसार क्रमांक ठरवला जाईल. त्याप्रमाणेच उमेदवारीचा निर्णयही घेतला जाईल. सध्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मत आणि सर्व्हेचा अंदाज 90 ठिकाणी जुळला असून इतर 10 एकमत झालेले नाही. यात तफावत आहे. त्यामुळे इतर 90 ठिकाणी प्रदेश नेतृत्व कोणताही हस्तक्षेप केला जाणार नसून अंतिम मान्यता मिळेल. लवकरच नावेही जाहीर केले जातील, असेही चंद्रकांत पाटील सांगितले.

युती झाली नाही, तर...

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा विधानसभेच्या निवडणुका या देश आणि राज्य पातळीवर होतात. याचा थेट परिणाम स्थानिक नेतृत्वावर होतो. स्थानिक नेतृत्वाला सातत्याने तडजोड करावी लागतो. यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य द्यावे लागते. आताही नुकताच पार पडलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत 70 टक्के ठिकाणी युती झाली. 30 टक्के ठिकाणी अडचणी आल्या होत्या. तर आगामी महापालिका निवडणुकीही महायुती म्हणूनच आमचा लढण्याचा प्रयत्न राहील. पण युती झालीच नाही, तर मित्र पक्षांवर टीका करायची नाही, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

Chandrakant Patil
Chandrakant Patil News : 'राष्ट्रवादी'च्या चिन्हाचा निर्णय चंद्रकांतदादांनीच केला जाहीर; अजितदादांनाही सूचना दिल्याचा दावा

FAQs :

1. पीसीएमसी आचारसंहिता कधी लागू होऊ शकते?
चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्यानुसार २० किंवा २२ डिसेंबरला लागू होण्याची शक्यता आहे.

2. भाजपमध्ये प्रवेश इच्छिणाऱ्या माजी नगरसेवकांबाबत काय निर्णय?
त्यांच्या नावावर स्थानिक गाभा समितीचे एकमत झाल्यानंतरच प्रवेश दिला जाईल.

3. भाजप युतीतून निवडणूक लढवणार का?
युती करण्याचा प्रयत्न असेल, असे पाटील यांनी सांगितले.

4. युती न झाल्यास काय मार्गदर्शन आहे?
फडणवीस यांनी मित्रपक्षांवर टीका न करण्याचे निर्देश दिल्याचे पाटील म्हणाले.

5. बैठक कुठे झाली?
पिंपरी-चिंचवडच्या पिंपळेसौदागर येथे बैठक घेण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com