CRPF Recruitment : क्रीडापटूंना CRPF मध्ये नोकरीची संधी; 169 जागांसाठी भरती

Constable posts Sports Quota : विद्यापीठाचे प्रतिनिधित्व किंवा राज्यपातळीवर शालेय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे, असे खेळाडू पात्र ठरतील.
CRPF Recruitment:
CRPF Recruitment:Sarkarnama
Published on
Updated on

पोलिस दलात नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या क्रीडापटूंसाठी सुवर्णसंधी आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या वतीने भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत खेळाडू कोट्यातून कॉन्स्टेबलची पदे भरली जाणार आहेत. यासाठी उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

केंद्रीय राखीव दलाच्या वतीने कॉन्स्टेबलची एकूण 169 रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती क्रीडापटूंसाठी करण्यात येणार आहे. यासाठी उमेदवाराने विहित नमुन्यातील आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. उमेदवाराने खेळाडू म्हणून राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये राज्य किंवा देशपातळीवर प्रतिनिधित्व केलेले असावे. ज्या उमेदवाराने त्यांच्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व किंवा राज्यपातळीवर शालेय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे, असे खेळाडू या नोकरभरतीसाठी पात्र ठरतील.

या भरतीसाठी पात्र खेळाडूंचे वय हे दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 23 पर्यंत असावे. तसेच सरकारी नियमांनुसार मागासवर्गीय उमेदवारासाठी कमाल 10 वर्षे अधिक वयाची सवलत दिली जाणार आहे, तर इतर मागासवर्गीयांसाठी 8 वर्षे सूट दिली जाणार आहे. तसेच या भरतीसाठी खुला आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकडून 100 रुपये भरती शुल्क आकारण्यात येणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी भरती शुल्क माफ करण्यात आले आहे.

भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या खेळाडूंनी आपला अर्ज https: / / recruitme nt. crpf.gov. in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज भरत असताना उमेदवाराने आपली शैक्षणिक आणि क्रीडाप्रकाराची सविस्तर माहिती भरायची आहे. त्यामध्ये क्रीडाप्रकारात मिळालेल्या सुवर्ण, रौप्य, कांस्यपदकाचाही उल्लेख करायचा आहे. निवड प्रक्रियेमध्ये याचा विचार केला जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. या भरतीसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी पुढील लिंकवर भेट द्यावी. जाहिरात लिंक -https://drive.google.com/file/d/13_cRSYeXbxZzOB9x8R5l0cTVbEM9FSce/view

R...

CRPF Recruitment:
MNS Rally in Kolhapur : मनसेच्या जिल्हाध्यक्षासह 300 जणांवर गुन्हा दाखल: विनापरवाना रॅली भोवली...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com