Maharashtra Government : तरुणांना प्रशासनामध्ये काम करण्याची मोठी संधी! दरमहा 61 हजार मिळवा...

Maharashtra CM Fellowship News : फेलोंचा दर्जा हा शासकीय सेवेतील गट-अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असेल. फेलोशिपसाठी राज्यभरातील 60 फेलोंची निवड केली जाणार आहे.
CM Devendra Fadnavis
CM Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी राज्यातील लाखो तरुण प्रयत्न करत आहेत. पण परीक्षा न देता नोकरी नव्हे पण प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या संकल्पनेतील ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26’ जाहीर करण्यात आला आहे.

फेलोंचा दर्जा हा शासकीय सेवेतील गट-अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असेल. फेलोशिपसाठी राज्यभरातील 60 फेलोंची निवड केली जाणार आहे. त्यासाठी निवडीचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेली असल्यास आणि पदवी परीक्षेत किमान 60 टक्के गुण असलेले तरुण या फेलोसाठी पात्र ठरतील. त्याचप्रमाणे अनुभवाचीही अट घालण्यात आली आहे.

CM Devendra Fadnavis
Harshvardhan Sapkal Politics: काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे आता थेट अमित शहांना चॅलेंज; ‘... तेव्हाच तुम्ही रायगडावर पाऊल ठेवा’

किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक असणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप / अप्रेंटीसशिप /आर्टीकलशिपसह 1 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल.

फेलोसाठी वयाची अटही घालण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान 21 वर्षे व कमाल 26 वर्षे असावे लागेल. या फेलोशिपसाठी अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या ऑनलाईन अॅप्लिकेशन प्रणालीद्वारे अर्ज करता येणार आहे. त्यासाठी 500 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

CM Devendra Fadnavis
Sanjay Shirsat On Chandrakant Khaire : रामनवमीच्या मुहूर्तावर संजय शिरसाट यांच्याकडून खैरेंना पुन्हा टाळी! पक्षात येण्याची दिली खुली आॅफर..

महिलांसाठी जागा राखीव

फेलोंची संख्या 60 असून त्यापैकी महिला फेलोंची संख्या एकूण संख्येच्या 1/3 राहील. पात्र महिला उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरुष फेलोंची निवड करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेच्या माध्यमातून ही निवड केली जाणार आहे. याविषयी mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.

नियुक्ती कुठे केली जाईल?

निवड झालेल्या फेलोंपैकी आवश्यकतेनुसार निवडक 20 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी दोन ते तीन फेलोंचा गट नियुक्त केला जाईल. या गटातील एक फेलो संबंधित जिल्हाधिकारी व एक ते दोन फेलो मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतील. ही नियुक्ती वर्षभरासाठी असेल.

मानधनही मिळणार

निवड झालेल्या फेलोंना वर्षभराच्या कालावधीसाठी दरमहा 61 हजार 500 रुपयांचे मानधनही मिळणार आहे. त्याचप्रमाणे फेलोंसाठी आयआयटी, मुंबई यांच्या सहकार्यातून स्वतंत्र सार्वजनिक धोरण या विषयातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित केला जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com