Covid New Variant JN 1 : कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची महाराष्ट्रात एन्ट्री, आरोग्य यंत्रणा अलर्ट; मुख्यमंत्री शिंदेंचे जनतेला आवाहन

Coronavirus New Variant JN 1 CM Eknath Shinde Appeal Peoples : करोनाच्या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण राज्यात आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे...
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

New Covid Variant In Maharashtra : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आला आहे. या व्हेरिएंटचा एक रुग्ण महाराष्ट्रात सिंधुदुर्गात आढळला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा घेतला. आगामी सण, नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. आपली यंत्रणा पूर्णपणे अलर्ट असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.

कोरोनाचा जेएन-वन व्हेरिएंटमुळे राज्य सरकार सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागाची तातडीने बैठक घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच आरोग्य यंत्रणा संपूर्णपणे सज्ज असून जनतेने घाबरण्याचे कारण नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Eknath Shinde
CP Retesh kumar : पोलिस आयुक्तांचं मोक्काचं शतक, पण गुन्हेगारी कंट्रोलमध्ये येईना!

देशात कोरोनाचा नवीन जेएन-वन व्हेरिएंट आढळून आला आहे. महाराष्ट्रातही या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. त्या दृष्टीने आपल्याला आवश्यक ती खबरदारी आणि काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यशिक्षण विभाग असे दोन्ही मंत्री, मुख्यसचिव, संबंधित सचिव, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी असे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.

कोविडची पूर्वीची यंत्रणा, क्वारंटाइन बेड, ऑक्सिन बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटरचे बेड, पीएसए प्लँट, ऑक्सिजन प्लँट, आरटीपीसीआर लॅबसह सर्व यंत्रणा अलर्ट ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. इलेक्ट्रिक, स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. औषधांचा साठा तपासून तो व्यवस्थित ठेवण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या आहेत. तसेच ज्यांनी कोविडची लस घेतली नसेल त्यांच्यासाठी लसीकरण मोहीम राबवण्याची सूचनाही देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग हे दोन्ही विभाग काम करत असून अलर्ट आहेत. मॉकड्रीलही झाले आहे. त्यामुळे ही आरोग्य यंत्रणा अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

किती धोकादायक आहे नवीन व्हेरिएंट आणि काय आहेत लक्षणे?

कोरोनाचा हा व्हेरिएंट सौम्य आहे. पण तो झपाट्याने पसरतोय. त्यामुळे ज्यांना सर्दी, खोकला आणि ताप अशी लक्षणे असतील त्यांनी गर्दीत जाणे टाळले पाहीजे. स्वतःला वेगळे केले पाहिजे. यासोबतच गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. नाताळचा सण येतो. तसेच नववर्षही येत आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. पण घाबरण्याचे काहीच कारण नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde
State Government Announcement : राज्य सरकारची मोठी घोषणा; कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com