CP Retesh kumar : पोलिस आयुक्तांचं मोक्काचं शतक, पण गुन्हेगारी कंट्रोलमध्ये येईना!

mcoca operations : ६४९ गुंड गजाआड,सायबर गुन्हेगारी ठरतेय डोकेदुखी
CP Retesh kumar
CP Retesh kumarsarkarnama

Pimpri Chinchwad : पुणे पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रितेश कुमार यांनी शहरातील गुंड टोळ्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यावर भर दिला. रितेशकुमार यांनी पदभार स्वीकारून आज (ता.१६) एक वर्ष झाले. या कालावधीत त्यांनी `मोक्का`अंतर्गत १०० गुन्हेगारी टोळ्यांच्या विरोधात कारवाई केली. रितेशकुमार यांना पदभार स्वीकारून वर्ष होत असताना मोक्काच्या कारवाईचे देखील त्यांनी अनोखे शतक मारले. मोक्काच्या कारवाईचा तडाखा साडेसहाशे सराईत गुन्हेगारांना मिळाला.मात्र, येवढ्या कारवाईनंतरही शहरातील गु्न्हेगारी म्हणावी तशी नियंत्रणात आलेली नाही.

CP Retesh kumar
Onion Issue : 'इथेनॉलनिर्मितीच्या परवानगीत त्रुटी; कांदा निर्यातबंदीबाबत शाहांसोबत सोमवारी बैठक'

शंभरावा मोक्का सौरभ शरद शिंदे (वय २२) टोळीला आज लागला.सौरभसह त्याच्या टोळीतील तेजस शंकर जगताप (वय २०),चंदर हुनप्पा राठोड (वय २२),अनिकेत सुधीर काटकर (वय २२)आणि पंकज संजय दिवेकर (वय १९,सर्व रा.बिबवेवाडी,पुणे) या त्याच्या चार साथीदारांना या कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले.या टोळीविरुद्ध गेल्याच महिन्यात ८ तारखेला खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता.बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पीआय सविता ढमढेरे यांनी डीसीपी (झोन ५) आर.राजा यांच्या मार्फत शिंदे टोळीला मोक्का लावण्याचा प्रस्ताव दिला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्याला अॅडिशनल सीपी रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिली. तर,सीपींनी त्यावर मोहोर उमटवली.तर,या अगोदरची ही कारवाई शुक्रवारी (ता.१५) करण्यात आली होती. त्यात लोणी काळभोर पोलिसांनी वैभव ऊर्फ गोट्या राजाराम तरंगे (वय २०)या टोळीप्रमुखासह त्याचे दोन साथीदार सागर अरण सिन्हा (वय १९, दोघेही रा.उरुळीकांचन,ता.हवेली,जि.पुणे) आणि यश लोणारी यांना हा हिसका देण्यात आला.

सायबर गुन्हेगारीने वाढली

मोक्काचा तडाखा देऊनही पुणे शहरातील गुन्हेगारी अपेक्षित म्हणावी अशी आटोक्यात आलेली नाही.गंभीर गुन्हे घडतच आहेत.त्यातही सायबर क्राईम ही पोलिसांची मोठी डोकेदुखी झाली आहे.त्यात त्यांचा शोध लागण्याचे प्रमाण कमी असल्याने पोलिसांची चिंता वाढलेली आहे.दुसरीकडे पोलिस त्याबाबत म्हणजे त्यांची वेबसाईट अपडेट नाही. गुन्ह्यांची कुंडली तेथे नाही.२०१९ च्या वर्षातील गुन्हेगारीची आकडेवारी तेथे आहे.त्यानंतरच्या वर्षातील आकडेवाडी तेथे नाही.महिनानिहाय तुलनात्मक आलेख,तर दूरच राहिला.त्यांच्या तुलनेत त्यांच्यातूनच १५ ऑगस्ट २०१८ रोजी निर्माण करण्यात आलेले पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय त्याबाबतीत आघाडीवर आहे.त्यांची वेबसाईट आणि त्यावरील गुन्ह्यांचा तक्ता महिनानिहाय अपडेट आहे.

CP Retesh kumar
Crime News : लग्न झालेल्या शिक्षिकेने केले मोठे कांड...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com