Vikas Lavande Ink Attack : शाईफेक प्रकरण तापले; विकास लवांडेंसाठी शरद पवारांचा थेट पोलीस महासंचालकांना फोन, CM फडणवीसांनाही भेटणार

Sharad Pawar on Vikas Lavande Ink Attack Case : 'शरद पवार साहेबांनी मला रात्री फोन करून बोलावून घेतले त्यानुसार आत्ता पुण्यात मोदी बाग येथे भेट आणि मीटिंग झाली. साहेबांनी माझ्याकडून सगळ्या घटनाक्रम आणि एकूणच हा गेले काही दिवस आपण चालू असलेल्या संघर्ष वस्तू स्थिती आणि भागवत वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांचे समाजमन भूमिका समजावून घेतली.'
Vikas Lavande meets Sharad Pawar
NCP-SP leader Vikas Lavande meets Sharad Pawar at Modi Bagh in Pune after the controversial ink attack incident that sparked major Maharashtra political tensions.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 10 May : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाई फेक प्रकरणानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत खुद्द शरद पवार यांनी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे.

दरम्यान, आता शरद पवार हा विषय थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. काल घडलेल्या शाई फेकीच्या घटनेनंतर विकास लवांडे यांनी आज पुण्याच्या 'मोदी बाग' निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली.

रात्री उशिरा पवारांनी स्वतः फोन करून लवांडेंना भेटीसाठी बोलावले होते. या भेटीत लवांडेंनी घडलेला संपूर्ण घटनाक्रम, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष आणि वारकरी संप्रदायाची भूमिका पवारांसमोर मांडली. घडलेला घटनाक्रम ऐकल्यानंतर शरद पवारांनी तातडीने राज्याच्या पोलीस महासंचालिका आणि पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन लावला.

Vikas Lavande meets Sharad Pawar
Vijay CM Oath Ceremony : तमिळनाडूत विजय यांचा शपथविधी; 'या' नेत्यांनाही मंत्रिपदाची संधी, यादी आली समोर...

सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या व्यक्तीवर अशा प्रकारे हल्ले होणे गंभीर असल्याचे सांगत पवारांनी या प्रकरणाचा तपास योग्य प्रकारे करण्याची विनंती केली. तसेच, विकास लवांडे यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्याबाबतही त्यांनी प्रशासनाला मागणी केली. महत्त्वाची बाब म्हणजे, हे प्रकरण केवळ पोलीस तक्रारीपुरते मर्यादित राहिलेले नाही. शरद पवार आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेल्या बैठकीमध्ये हा मुद्दा मांडणार असल्याचा समोर आलं आहे.

त्यामुळे फडणवीस याबाबत नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या भेटीबाबत माहिती देताना लवांडे म्हणाले, "शरद पवार साहेबांनी मला रात्री फोन करून बोलावून घेतले त्यानुसार आत्ता पुण्यात मोदी बाग येथे भेट आणि मीटिंग झाली. साहेबांनी माझ्याकडून सगळ्या घटनाक्रम आणि एकूणच हा गेले काही दिवस आपण चालू असलेल्या संघर्ष वस्तू स्थिती आणि भागवत वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांचे समाजमन भूमिका समजावून घेतली.

Vikas Lavande meets Sharad Pawar
Rupali Chakankar : "हजर आहे सर..."; रुपाली चाकणकर SIT चौकशीसाठी रवाना होताच सुषमा अंधारेंनी डिवचलं

त्यानंतर साहेबांनी राज्याचे पोलीस महासंचालक आणि पुणे पोलीस आयुक्तांना फोन करून घटनेचे गांभीर्य सांगितले आणि विकास लवांडे यांना संरक्षण देण्याबाबत सूचना केली. तसेच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईत साहेबांची या विषयावर बैठक होणार आहे असे साहेबांनी मला बैठकीत सांगितले."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com