Mainak Ghosh : सलाम...!!! वडिलांचे अत्यंविधी करून धाराशिवचे CEO पुरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर

Mainak Ghosh Dharashiv Flood Relief : धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले डॉ. मैनक घोष यांच्या वडिलांचे नुकतंच निधन झालं. मात्र, वडिलांच्या निधनाचं दु:ख बाजूला सारून धाराशिवमधील पुराचे गांभीर्य लक्षात घेत घोष हे वडिलांच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर अतिवृष्टीचा आढावा घेण्यासाठी गेले
Dharashiv CEO Dr. Mainak Ghosh
Dr. Mainak Ghosh, Dharashiv CEO, inspects flood-hit farms despite personal loss, highlighting sensitive and duty-driven leadership in Maharashtra.Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News, 30 Sep : सरकारी अधिकाऱ्यांची सर्वसामान्य नागरिकांच्या मनात एक वेगळीच प्रतिमा अलिकडच्या काही दिवसांत निर्माण झाली आहे. सततच्या येणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आणि पदाचा गैरवापर केल्याच्या बातम्यांमुळे सरकारी अधिकाऱ्यांची प्रतिमा मलिन झाल्याचं पाहायला मिळत आहे.

अशातच नुकतंच संपूर्ण मराठवाडा पुराच्या पाण्यात असताना लोकांची घरे वाहून गेल्याने कित्येक जण रस्त्यावर आले, शेतकरी संकटात सापडलेला असताना धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी एका सांस्कृतिक महोत्सवात डान्स केल्याचं प्रकरण समोर आलं.

या कृत्यामुळे त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका केली गेली. त्यामुळे या अधिकार्‍यांमध्ये संवेदनशीलता आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच आता एका सरकारी कर्मचाऱ्याने केलेल्या कामाचे राज्यभरातून कौतुक केलं जात आहे.

Dharashiv CEO Dr. Mainak Ghosh
Aditya Thackeray : 'फक्त आश्वासन...'; CM फडणवीस अन् पंतप्रधान मोदींच्या भेटीवरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले डॉ. मैनक घोष यांच्या वडिलांचे नुकतंच निधन झालं. मात्र, वडिलांच्या निधनाचं दु:ख बाजूला सारून धाराशिवमधील पुराचे गांभीर्य लक्षात घेत घोष हे वडिलांच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर अतिवृष्टीचा आढावा घेण्यासाठी गेले.

त्यामुळे मनात वडिलांच्या निधनाचं दु:ख असतानाही आपल्या कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या संवेदनशील सीईओ मैनक घोष यांचं कौतुक केलं जात आहे. शिवाय त्यांच्या या कृत्यामुळे पुराच्या पाण्यात लोक मरत असताना सार्वजनिक कार्यक्रमात नाचणारे जिल्हाधिकारी कुठे आणि वडिलांच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेणारे कर्तव्यदक्ष मैनक घोष कुठे? अशी तुलना नागरिकांकडून केली जात आहे.

Dharashiv CEO Dr. Mainak Ghosh
Ahilyanagar Muslim mob violence : अहिल्यानगरमध्ये हिंसाचार, चार वेगवेगळ्या फिर्यादी, 290 जणांविरोधात गुन्हे; 'मास्टरमाइंड' गजाआड

मिळालेल्या माहितीनुसार मूळचे पश्चिम बंगालचे असणारे घाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनक घोष यांच्या वडिलांचे 27 सप्टेंबर रोजी निधन झालं. त्यांनंतर त्यांनी वडिलांचे अंत्यसंस्कार केले आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करत पूरस्थितीचा आढावा घेतला. त्यामुळे डॉ. घोष यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com