Marathwada Divisional Commissioner News : मराठवाडा विभागीय आयुक्तपदी दिलीप गावडेंची नियुक्ती!

Marathwada Divisional Commissioner Dilip Gawde : याआधीचे विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड हे 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून हे पद रिक्त होते.
Dilip Gawde
Dilip GawdeSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Divisional Commissionerate News : मागील 24 दिवसांपासून रिक्त असलेल्या मराठवाडा विभागीय आयुक्तपदी दिलीप गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे आदेश शासनाने मंगळवारी जारी केले आहेत. गावडे हे उद्या (ता.26) सकाळी पदभार स्वीकारणार आहेत.

गावडे हे 1990 मध्ये महसूल विभागात उपजिल्हाधिकारी म्हणून दाखल झाले. वाई, महाबळेश्वर येथे प्रांत अधिकारी म्हणून ते रुजू झाले. त्यानंतर पुणे येथे राजशिष्टाचार विभागात उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले.

त्यानंतर भूसंपादन अधिकारी, सातारा येथे जिल्हा पुरवठा अधिकारी, सांगली येथे निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त, त्यानंतर विदर्भात एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते कार्यरत होते.

Dilip Gawde
Police Action Bank Officer: बँकेच्या कर्जप्रकरणातील तक्रार मागे घेण्यासाठी मागितली लाच; वसुली अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

2007 मध्ये त्यांना आयएएस म्हणून बढती मिळाली. त्यानंतर गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगर महापालिकेचे आयुक्त, नाशिक येथे आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त, पर्यंटन विभागाचे संचालक व मानवी हक्क संरक्षण विभागाचे सदस्य सचिव आदी ठिकाणी त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला.

Dilip Gawde
Elections of Cooperative Societies ...म्हणून पुन्हा एकदा सहकारी संस्थांच्या निवडणुका सहकार विभागाने पुढे ढकलल्या!

याआधीचे विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड हे 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून हे पद रिक्त होते. आर्दड यांनी जुलै 2023 मध्ये विभागीय आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. तत्कालीन विभागीय सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारल्यामुळे विभागीय आयुक्त पद रिक्त झाले होते.

या रिक्त झालेल्या जागेवर मधुकरराजे आर्दड यांची शासनाने 17 जुलै 2023 रोजी नियुक्तीचे आदेश काढले होते. ते त्यावेळी छत्रपती संभाजीनगर येथे मृदा व जल संधारण आयुक्त म्हणून कार्यरत होते. नवे विभागीय आयुक्त उद्या पदभार स्वीकारणार असल्यामुळे मराठवाड्यातील अनेक रखडलेले प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com