Shegaon News: मालमत्ता करावरून वाद पेटला, नगरपालिकेच्या विरोधात शहर संघर्ष समिती न्यायालयात जाणार

Shegaon Municipality News: शेगाव नगरपालिकेत मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर बोराडे यांनी मागील आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये शहरवासीयांना 'नवीन दराप्रमाणे मालमत्ता कर भरा,' अन्यथा मालमत्ता जप्त करण्याच्या नोटिसा पाठवल्या होत्या.
Shegaon Municipality
Shegaon MunicipalitySarkarnama
Published on
Updated on

Shegaon News: उच्च न्यायालयाने (High Court) 2008-09 ते 2011-12 च्या दराप्रमाणे करआकारणी करण्याचे आदेश दिलेले असताना आणि महाराष्ट्र राज्य नगर विकास विभागाने शेगाव नगरपालिकेच्या (Shegaon Municipality) नवीन मालमत्ता करआकारणीला स्थगिती दिल्याचे आदेश झुगारून शेगाव नगरपालिकेकडून मनमानीपणे शहरवासीयांना नवीन दराप्रमाणेच मालमत्ता कराचा भरणा 17 मेपर्यंत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे.

शेगाव नगरपालिकेत (Shegaon Municipality) मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर बोराडे यांनी मागील आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये शहरवासीयांना 'नवीन दराप्रमाणे मालमत्ता कर भरा,' अन्यथा मालमत्ता जप्त करण्याच्या नोटिसा पाठवल्या होत्या. या विरोधात शेगाव संघर्ष समितीचे दिवंगत अध्यक्ष शेखर नागपाल, सचिव विजय मिश्रा यांनी हरकत दाखल केली होती. त्या हरकतीची दखल घेऊन प्रशासनाने नगरपालिकेच्या हद्दीतील रहिवाशांकडून मालमत्ता करासंबंधी हरकती डिसेंबर 2023 मध्ये मागविल्या होत्या.

त्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवण्यास सुरुवात केली होती. नगरपालिका कार्यालयात अपिलीय समितीकडून शहरवासीयांचे आक्षेप नोंदविण्याचे कार्य सुरू होते. परंतु सदर अपिलीय समिती ही कुठलीही सुनावणी न करता केवळ देखावा करीत होती. याबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर या समितीने केवळ उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे नागरिकांनी आमदार डॉ. संजय कुटेंकडे (Dr. Sanjay Kute) याबाबत तक्रार केली. आमदारांनी याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांकडे नगरपालिकेच्या करआकारणी प्रक्रियेस स्थगिती देण्याची मागणी पत्राद्वारे केली होती.

आमदारांनी दिलेल्या पत्राची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मालमत्ता कराबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाचे कार्यासन अधिकारी वी. ना. धाईंजे यांनी शेगाव नगरपालिकेला 29 डिसेंबर 2023 रोजी पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आलेल्या अहवालावर निर्णय होत नाही, तोपर्यंत नवीन मालमत्ता कर (Property Tax) प्रक्रियेस स्थगिती देण्यात येत असल्याचे लेखी कळविले होते. त्यामुळे मालमत्ता कर प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. या संबंधित पत्र मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर बोराडे यांनी शेगाव संघर्ष समितीचे तत्कालीन अध्यक्ष स्वर्गीय शेखर नागपाल यांना पाठविले होते. (Shegaon Sangharsh Committee)

Shegaon Municipality
Pune Crime news : पुण्यातील खळबळजनक घटना; पोलिस कर्मचाऱ्याची चौकीतच गोळ्या झाडून आत्महत्या

लेखी स्वरूपात पत्र दिल्यानंतरही शहरवासीयांना नगरपालिकेकडून केलेल्या नवीन सर्वेक्षणाप्रमाणे नवीन वाढीव मालमत्ता कर दराने नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे 2012-13, ते 2016-17, सन 2021-2022 या तीन आर्थिक वर्षात शेगाव नगरपालिकेकडून नवीन करआकारणीप्रमाणे शहर मालमत्ता करधारकांकडून वसूल करण्यात आलेली अगाऊ रक्कम नगरपालिकेकडे जमा असतानाही, त्या आगाऊ रकमेला सामावून घेण्याकरिता नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न करता उलट मालमत्ता धारकावर वार्षिक 24% दंड आकारण्यात आला.

Shegaon Municipality
Eknath Khadse News : स्वगृही परतण्यासाठी नाथाभाऊंना भाजपने घातल्या अटी; आमदारकी अन्...

नवीन करआकारणी दराप्रमाणे नागरिकांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत, तर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अध्यक्ष शेखर नागपाल यांना पाठविलेल्या पत्रात पालिकेकडे जमा असलेली आगाऊ रक्कम भविष्यामध्ये समायोजित करून घेण्यात येणार असल्याचे पोकळ आश्वासन दिले आहे. मात्र, एकीकडे आगाऊ रक्कम समायोजित करण्याचे सांगायचे व दुसरीकडे 24 टक्के दंड आकारणी करावी ही दुटप्पी भूमिका शेगाव नगरपालिका मुख्याधिकारी घेत असल्याचे उघड होत आहे

Shegaon Municipality
Jalgaon BJP Politics : भाजप दुसऱ्यांदा स्मिता वाघ यांची उमेदवारी बदलणार का? 'हे' आहे कारण

उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जुन्या दरानेच मालमत्ता करआकारणी करण्याचा स्पष्ट आदेश दिलेला असताना आणि महाराष्ट्र राज्य नगर विकास विभागाचे स्थगितीचे आदेश दिले असताना मुख्याधिकारी मनमानी पद्धतीने "हम करे सो कायदा" अशा पद्धतीचा कारभार करीत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे उच्च न्यायालयाकडून जुन्या कर पद्धतीनुसार करआकारणी करण्याचे व नगरपालिकेने स्वतःच्या सक्षम यंत्रणेमार्फत नवीन मालमत्ता कर सर्वेक्षण करावा, असे आदेश असताना नगरपालिकेने मात्र न्यायालयाचे आदेश झुगारून, अमरावती येथील खासगी सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीकडून शहरातील मालमत्तेचे सर्वेक्षण केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेगाव नगरपालिकेच्या अशा मनमानी कारभाराविरोधात एकाही राजकीय पुढाऱ्याने भूमिका न घेतल्याने शहरवासी आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत. मात्र, नगरपालिकेच्या अशा मनमानी कारभाराविरुद्ध शेगाव संघर्ष समिती न्यायालयापर्यंत लढा देण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा शेगाव संघर्ष समितीचे सचिव विजय मिश्रा यांनी दिला आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com