Pune Crime news : पुण्यातील खळबळजनक घटना; पोलिस कर्मचाऱ्याची चौकीतच गोळ्या झाडून आत्महत्या

Policeman suicide at the police station : कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज
policeman suicide
Policeman suicide Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्याची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे शहरातील पोलिस चौकीतच एका पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खडक पोलिस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या लोहियानगर पोलिस चौकीमध्ये ही दुर्दैवी घटना घडली.

भारत दत्ता आस्मर असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिस (Police) चौकीतच या पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःवर एकापाठोपाठ चार गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. आस्मर याने पहाटे आपल्याकडे असलेल्या बंदुकीतून गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

policeman suicide
EVM Theft News : 'ईव्हीएम' चोरी प्रकरणातील अधिकाऱ्यांचे निलंबन अखेर रद्द !

गुरुवारी पोलिस कर्मचारी आस्मर नेहमीप्रमाणे रात्रपाळीसाठी कामावर आले होते. ते पुण्यातील (Pune) खडक पोलिस स्टेशनमध्ये पोलिस शिपाई म्हणून कार्यरत होते. त्यांची नेमणूक लोहियानगर पोलिस चौकी येथे होती. त्यामुळे ते ड्यूटीसाठी तेथे गेले. चौकीत वर असलेल्या आराम खोलीत ते बंदूक बरोबर घेऊन गेले होते. पहाटेच्या सुमारास अचानक खोलीतून गोळीबाराचा आवाज झाला. इतर कर्मचाऱ्यांनी तेथे जाऊन पाहिले असता, त्यांनी स्वत:वर एकापाठोपाठ चार गोळ्या झाडल्या. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ड्यूटीच्या ठिकाणीच त्यांनी अशा पद्धतीचे पाऊल का उचलले, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. कौटुंबिक वादातून त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, यामागे अन्य कोणते कारण आहे का, याचा तपासदेखील पोलिसांकडून केला जात आहे. भारत आस्मर हे दहा वर्षांपूर्वी पोलिस दलात दाखल झाले होते. काही दिवसांपासून तणावात होते. परंतु त्यासंदर्भात ते कोणाकडे काही बोलले नव्हते. त्यांच्या तणावाचे कारण समजले नव्हते.

policeman suicide
Nana Patole News: चव्हाण आता काँग्रेसमध्ये नाहीत, त्यावर चर्चा नको : पटोले; जागावाटपाच्या घोळाला चव्हाणच जबाबदार...

पोलिस कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्याची गरज

पोलिस दलात काम करताना कर्मचारी, अधिकारी यांच्यावर कामाचा ताण वाढत असल्याचे यापूर्वीदेखील वारंवार समोर आले आहे. अनेकदा सुट्ट्यांच्या दिवशी कर्मचाऱ्यांना ड्यूटीवर बोलाविले जाते. यासह शहरात सण, मोर्चे, आंदोलने तसेच महत्त्वाच्या नेत्यांचे आगमन झाल्यास बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या अचानक रद्द केल्या जातात. या सुट्ट्या पुन्हा दिल्या जात नाहीत, त्यामुळे कर्मचारी, अधिकारी यांना सलग दिवस काम करावे लागते. वरिष्ठ अधिकारी ऐकून घेत नाहीत. तक्रार केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना विनाकारण त्रास दिला जातो, अशा प्रकारांमुळे ताण वाढत असल्याचे वास्तव एका पोलिस कर्मचाऱ्याने मांडले. ठराविक काळानंतर कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्याबरोबरच त्यांच्याशी संवाद साधने आवश्यक असल्याची अपेक्षादेखील या कर्मचाऱ्याने व्यक्त केली.

R

policeman suicide
Fadnavis Indapur Tour : पवारांच्या सभेला दांडी मारणाऱ्या दशरथ मानेंची फडणवीसांनी घरी जाऊन घेतली भेट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com