Dry Days in India : ‘या’ मोठ्या शहरात एकाच आठवड्यात पाच दिवस ‘ड्राय डे’; जाणून घ्या तारखा आणि कारण...

Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जूनला जाहीर होणार आहे. त्यामुळे या दिवशी संपूर्ण देशात ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. तर विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे बेंगलुरूमध्ये चार दिवस ड्राय डे असेल.
Dry Days in Bengaluru
Dry Days in BengaluruSarkarnama

Bengaluru Political News : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी (Lok Sabha Election Result) आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे बेंगलुरूतील मद्यप्रेमींची निराशा होणार आहे. बेंगलुरू शहरामध्ये जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तब्बल पाच दिवस मद्य विक्रीला मनाई (Dry Days in India) करण्यात आली आहे. मागील काही वर्षांत एकाच आठवड्यात पाच दिवस ड्राय डे येण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासनाकडून ड्राय डे निश्चित करण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणुकीचे मतदानाचे सहा टप्पे पूर्ण झाले असून आता केवळ एकच टप्पा उरला आहे. त्यासाठी एक जूनला मतदान (Voting) होणार आहे. त्यानंतर चार जूनला मतमोजणी होईल. या दिवशी संपूर्ण देशात ड्राय डे असेल. निवडणूक आयोगाने (Election Commission) महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये विधानपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या (Maharashtra Legislative Council Election) चार जागांसाठी जून महिन्याच्या अखेरीस मतदान होणार आहे. (Dry Days in Bengaluru)

Dry Days in Bengaluru
BJP Political News : EVM तोडफोडप्रकरणी भाजप उमेदवाराला अटक; पत्नीसह गेले होते मतदानाला...

कर्नाटकमध्ये (Karnataka Election) जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मतदान आणि मतमोजणी आहे. मतदान तीन जूनला तर मतमोजणी सहा जूनला होणार आहे. या निवडणुकीमुळे प्रशासनाने एक जूनला दुपारी चार वाजल्यापासून तीन जूनपर्यंत मद्यविक्रीला मनाई केली आहे. तर चार जूनला लोकसभेचा निकाल असल्याने तीन जूनला मध्यरात्री 12 ते चार जूनला मध्यरात्री 12 वाजेपर्यंत मद्य विक्री करता येणार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सहा जूनला विधानपरिषदेचा निकाल असेल. यादिवशी मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. पाच जूनला मात्र ड्राय डे असणार नाही. एक ते सहा जून या कालावधीत केवळ मद्य विक्रीला बंदी असेल. पब आणि बारमध्ये गैर-अल्कोहोलिक पेय आणि खाद्यपदार्थांची विक्री करता येणार आहे.    

Dry Days in Bengaluru
Owaisi Vs Modi : 'आता तो दिवस दूर नाही, जेव्हा मोदी म्हणतील..' ; ओवैसींनी बिहारमधून साधला निशाणा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com