BJP Political News : EVM तोडफोडप्रकरणी भाजप उमेदवाराला अटक; पत्नीसह गेले होते मतदानाला...

Prashant Jagdev News : ईव्हीएमध्ये बिघाड झाल्याने जगदेव व त्यांच्या पत्नीला बराचवेळ रांगेत उभे राहावे लागला होता. त्यामुळे संतापलेल्या जगदेव यांनी मशीन जमिनीवर आपटली.
Prashant Jagdev
Prashant JagdevSarkarnama

Odisha Politics : लोकसभा निवडणुकीचा सहावा टप्पा शनिवारी (ता. 25) पार पडला. ओडिशामध्ये लोकसभेबरोबच विधानसभेसाठीही मतदान झाले. मतदान सुरू असताना भाजप (BJP Political News) उमेदवाराने बराचवेळ रांगेत उभे राहावे लागल्याने थेट EVM मशीनची तोडफोड केल्याची घटना घडली. या घटनेनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. आता ते जेलमध्ये आहे. त्यांना जामीन न मिळाल्यास जेलमधून निकाल पाहावा लागण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे.

ओडिशातील चिल्का विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रशांत जगदेव (Prashant Jagdev) यांना जेलवारी करावी लागली आहे. ते मतदानासाठी पत्नीसह एका मतदान केंद्रावर केले होते. ईव्हीएम मशीन खराब झाल्यामुळे त्यांना बराचवेळ रांगेत उभे राहावे लागले. त्यामुळे संतापलेल्या जगदेव यांनी केंद्रातील अधिकाऱ्यांसोबत वाद झाला. (Assembly Election 2024)

Prashant Jagdev
Amit Shaha News : भाजप सत्तेत आल्यास 'एक देश एक निवडणूक', तर 'या' कायद्याचीही अंमलबजावणी करणार; शहांचं आश्वासन

वाद टोकाला पोहचल्यानंतर जगदेव यांनी ईव्हीएम मशीन हिसकावून घेत जमिनीवर फेकली. त्यामुळे मशीन तुटली. पोलिस अधिक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर जगदेव यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना कोर्टात सादर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदारांनी (MLA) मतदान केंद्रावर गोंधळ घातला. मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण करून येथील कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन केल्याचा तक्रार जगदेव यांच्याविरोधात करण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्रीतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यास सांगितल्याचे अविनाश कुमार यांनी नमूद केले.

भाजपने (BJP) हे आरोप फेटाळून लावले आहे. एका नेत्याने दावा केला आहे की, ‘जगदेव यांच्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत. मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांनी अनेक मतदारांसोबत गैरवर्तन केले. आमदारांसोबतही हा प्रकार घडला.’ सत्ताधारी बीजेडीने जगदेव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  

Prashant Jagdev
Swati Maliwal News : ध्रुव राठी येणार अडचणीत? स्वाती मालीवाल यांच्याकडून गंभीर आरोप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com