Mumbai Local News : मुंबईकरांसाठी मोठी बातमी; 'या' स्टेशनमधील फलाटांचे क्रमांक बदलले

Platform number change : मध्य-पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या स्टेशनमधील फलाट क्रमांकांमध्ये आजपासून बदल
Dadar Railway Station
Dadar Railway StationSarkarnama
Published on
Updated on

रेल्वे ही मुंबईकरांची लाइफलाइन मानली जाते. रोज लाखो मुंबईकर आणि मुंबई महानगर क्षेत्रातील लाखो लोक लोकलने प्रवास करतात. मध्य, पश्चिम, हार्बर आणि ट्रान्स हार्बर यातून प्रवास हा नित्याचा भाग बनला आहे. या सर्व प्रवाशांसाठी ही मोठी बातमी. आजपासून (9 डिसेंबर) मध्य रेल्वेच्या दादर स्टेशनमधील फलाटांचे क्रमांक बदलण्यात आले आहेत.

Dadar Railway Station
Rajesh Kshirsagar : युवासैनिकांना हाकलून देण्याचे आदेश मातोश्रीवरून आले...

दादर हे मुंबईतील अत्यंत गर्दीचे स्टेशन आहे. दादरला पश्चिम आणि मध्य रेल्वेला जोडणारे स्टेशन आहे. शिवाय लांब पल्ल्याच्या गाड्याही दादर स्टेशनमधून सुटतात. त्यामुळेच प्रवाशांचा गोंधळ टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने फलाटांना सलग नंबर देण्याचा निर्णय घेतला. सध्या दादरच्या पश्चिम रेल्वेच्या स्टेशनवर 1 ते 7 क्रमांकाचे फलाट आहेत, तर पुढे दादर मध्य रेल्वे स्टेशनमध्येही फलाट आहेत. त्यामुळे अनेकदा प्रवाशांचा गोंधळ उडायचा. हा गोंधळ टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या दादर स्टेशनमधील फलाटांचे क्रमांक बदलण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. त्याची आजपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता पश्चिम रेल्वेचे 1 ते 7 फलाट क्रमांक तसेच ठेवण्यात आले आहेत, तर पुढे मध्य रेल्वेच्या दादर स्टेशनमधील फलाट क्रमांक 8 ते 14 असे असतील. म्हणजेच...

फलाट क्रमांक 1 - आता ८ झाला आहे

(फलाट क्रमांक दोन बंद केला आहे)

फलाट क्रमांक 3 - आता 9

फलाट क्रमांक 4 - आता 10

फलाट क्रमांक 5 - आता 11

फलाट क्रमांक 6 - आता 12

फलाट क्रमांक 7 - आता 13

आणि फलाट क्रमांक 8 - आता फलाट 14 झाला आहे. या फलाटावरून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जातात.

दादर हे मुंबईतील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन आहे. इथे पश्चिम रेल्वेच्या 1 हजार 50 गाड्या तर मध्य रेल्वेच्या 900 हून अधिक गाड्यांची रोज वर्दळ असते. शिवाय पश्चिम रेल्वेच्या 18 आणि मध्य रेल्वेच्या 25 लांब पल्ल्यांच्या गाड्यांची वर्दळ आहेच. शिवाय खरेदीसाठी दादरला पसंती दिली जात असल्यामुळेही दादरला कायम गर्दी असते. या दोन्ही मार्गांवर प्रवाशांची कायम वर्दळ असते. त्यामुळे आता सलग फलाट क्रमांकांमुळे मुंबईकर आणि बाहेरून येणाऱ्या प्रवाशांचा फलाट क्रमांकावर जाण्याचा गोंधळ संपणार आहे.

(Edited by - Avinash Chandane)

Dadar Railway Station
Devendra Fadnavis : भाजपच्या नैतिकतेचे ऑडिट करण्याची वेळ; मलिक-पटेलांवरून फडणवीसांवर ठाकरेंचा निशाणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com