Modi Government : मोदी सरकारकडून 7.5 कोटी देशवासियांना गिफ्ट; PF बाबत घेतला मोठा निर्णय...

EPFO Enhances Auto-Settlement Limit: What You Need to Know : ‘ईपीएफओ’च्या नव्या नियमामुळे सदस्यांना फंड काढणे सुलभ आणि वेगात होणार आहे. प्रामुख्याने आपत्कालीन स्थितीमध्ये याचा अधिक उपयोग होणार आहे.
EPFO announces increase in auto-settlement limit for advance claims to ₹5 lakh, with claims processed within 72 hours for eligible members.
EPFO announces increase in auto-settlement limit for advance claims to ₹5 lakh, with claims processed within 72 hours for eligible members. Sarkarnama
Published on
Updated on

EPFO's Push Toward Digitization : कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) ने देशभरातील साडे सात कोटी नोकरदारांना मोठी खूशखबरी दिली आहे. EPFO ने पीएफ ची ऑटो-क्लेम सेटलमेंटची मर्यादा पाच लाखांपर्य़ंत वाढविण्यात आली आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवार याबाबतची घोषणा केली. या निर्णयाचा कोट्यवधी लोकांना फायदा होणार आहे.

‘ईपीएफओ’च्या नव्या नियमामुळे सदस्यांना फंड काढणे सुलभ आणि वेगात होणार आहे. प्रामुख्याने आपत्कालीन स्थितीमध्ये याचा अधिक उपयोग होणार आहे. कोरोना काळात सरकारने 2020 मध्ये ऑटो क्लेमची सुविधा सुरू केली होती. या काळात आजारपणासाठी फंडमधील पैसे काढणे शक्य झाले होते. आता त्याचा विस्तार करण्यात आला आहे.

ऑटो क्लेमची मर्यादा एक लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नवीन नियमांनुसार शिक्षण, लग्न आणि घरासाठीही पाचत लाख रुपयांचा क्लेम ऑटोमेटिक मंजूर होणार आहे. या सुविधेमुळे जवळपास 95 टक्के क्लेम तीन दिवसांत मंजूर होतील. याआधी त्यासाठी किमान दहा दिवसांचा कालावधी लागत होता.

EPFO announces increase in auto-settlement limit for advance claims to ₹5 lakh, with claims processed within 72 hours for eligible members.
Election Commission vs Rahul Gandhi : तुम्हीच तारीख अन् वेळ सांगा..! निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आधी चॅलेंज, आता पुरावेच दिले...

ईपीएफओ सदस्य यूपीआय आणि एटीएमच्या माध्यमातूनही फंडमधील पैसे लवकरच काढू शकतात. दावे फेटाळण्याचा दर 50 टक्क्यांवरून घटून 30 टक्के झाला आहे. त्यामुळे दावे मंजूर होण्याची शक्यता अधिक झाली आहे. केवायसी पूर्ण असेल, आधार, पॅनकार्ड, बँकेची माहिती ईपीएफओशी जोडलेली असेल तर कोणत्याही कागदपत्रांशिवाय क्लेमची प्रक्रिया सुरू होईल.

EPFO announces increase in auto-settlement limit for advance claims to ₹5 lakh, with claims processed within 72 hours for eligible members.
Donald Trump : बॉम्ब टाकू नका, विमाने परत बोलवा..! डोनाल्ड ट्रम्प यांना संताप अनावर, इस्त्राईलकडून झटका

काय करावे लागेल?

आपल्या UAN पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर तुम्हाला याचा फायदा घेता येईल. केवायसी असल्याची खात्री केल्यानंतर ऑनलाईन क्लेम करता येईल. त्यानंतर काही तासांत पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील. यूएएनशी आधार लिंक असल्यास आणि बँकेची माहिती अपडेट केल्यानंतर कोणत्याही मंजुरीची आवश्यकता भासणार नाही.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com