Kolhapur News, 05 August : कोल्हापूर जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे नद्यांचे पाणी पात्राबाहेर आल्याने पुराचे पाणी शेतशिवारात घुसले आहे. अनेक दिवस शेतातील पिकं पाण्याखाली असल्याने खरीप हंगामातील भात, सोयाबीन यासह उसाच्या शेतीचं प्रंचड प्रमाणात नुकसान झालं आहे.
पुराच्या पाण्यात बुडालेली पिके शंभर टक्के खराब झाली असून त्यांचे पंचनामे करुन त्यांना ‘एनडीआरएफ व एसडीआरएफ’ (NDRF,SDRF) निकष बाजूला ठेवून हेक्टरी 1 लाखांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके (Dr.Chetan Narake) यांनी केली आहे.
तसेच यासंदर्भात त्यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याशी संपर्क साधला असून याबाबतचे निवेदन देखील त्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे दिले आहे. गेली दहा दिवस भात, सोयाबीन व ऊस असे 60 हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली आहेत. भात व सोयाबीन पिके कुजली असून ऊस पाण्याखाली गेला आहे.
शिरोळ (Shirol), हातकणंगले, पन्हाळा व करवीर तालुक्याला मोठा फटका बसला आहे. करवीरमधील शिये, भुये, वडणगे, वरणगे, प्रयाग चिखली, आंबेवाडीसह पन्हाळ्यातील बाजारभोगाव, यवलूज, कळे, धामणी खोऱ्यात पुराच्या पाण्याने उभी पिके उध्वस्त झाली आहेत.
2019 व 2021 च्या महापूरानंतरची शेतकऱ्यांना (Farmer) मिळालेली भरपाई फारच तोकडी होती. ‘एनडीआरएफ’ व ‘एसडीआरएफ’ च्या निकषानुसार बागायत पिकांना हेक्टर 17 हजार रुपये नुकसान भरपाई मिळते. सलग 8 दिवस ऊस पाण्याखाली राहिला तर त्याचे 100 टक्के नुकसान होते. हेक्टरी शासन शेतकऱ्यांना 17 हजार रुपये भरपाई देते.
हे शेतकऱ्यांची चेष्टा असून ऊस उत्पादकांचे होणारे नुकसान पाहता गुंठ्याला किमान 1 हजार म्हणजेच हेक्टर 1 लाख रुपये भरपाई देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी चेतन नरके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यामुळे सरकार या मागणीवर काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.