
सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालयाने इंटेलिजेंस ब्युरोमध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर (ACIO) ग्रेड 2 च्या पदांसाठी बंपर भरतीची घोषणा केली आहे.
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 19 जुलै 2025 पासून सुरू होणार असून इच्छुक उमेदवारांनी www.mha.gov.in या गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला अर्ज दाखल करावा. अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 ऑगस्ट 2025 आहे.
या भरतीत विविध आरक्षित प्रवर्गासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या असून, अर्जदाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच, कॉम्प्युटरचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत शासकीय नियमानुसार सूट दिली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार लेव्हल 7 मध्ये 44,900 ते 1,42,400 पर्यंत पगार दिला जाईल. याशिवाय महागाई भत्ता, प्रवास भत्ता आदी सुविधाही दिल्या जातील.
या भरतीद्वारे आयबी एसीआयओ II/कार्यकारी पदांच्या एकूण 3717 पदे भरली जातील. यापैकी 1537 पदे अनारक्षितांसाठी तर 946 पदे ओबीसींसाठी, 442 पदे ईडब्ल्यूएससाठी आणि 566 पदे एससीसाठी,226 पदे एसटी प्रवर्गासाठी राखीव आहेत.
निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत होणार असून, पहिल्या टप्प्यात MCQ स्वरूपात पेपर असेल, ज्यामध्ये जनरल नॉलेज, करंट अफेअर्स, रिझनिंग आणि इंग्रजी यांचा समावेश असेल. दुसऱ्या टप्प्यात Descriptive स्वरूपातील पेपर असेल. त्यानंतर पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावा लागेल. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क 650 रुपये आहे, तर अनुसूचित जाती, जमाती व दिव्यांग उमेदवारांसाठी हे शुल्क 550 रुपये आहे. शुल्क केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाईल.
या भरतीसाठी उमेदवारांना टप्प्या टप्प्याने परीक्षा द्यावी लागेल. सर्वप्रथम टियर-1 आणि टियर-2 परीक्षा घेतली जाईल. यानंतर टियर-3 म्हणजेच मुलाखत/ व्यक्तिमत्व चाचणी घेण्यात येईल. सर्व टप्प्यांतील कामगिरीच्या आधारे अंतिम यादी तयार करण्यात येईल व यशस्वी उमेदवारांना पदावर नियुक्त करण्यात येईल.
इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता लवकरात लवकर अर्ज करावा आणि संबंधित नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.