Rubal Agrawal : मुंबई मेट्रोचे ‘कंट्रोल’ आता IAS रुबल अग्रवाल यांच्या हाती !

Mumbai Metro News : शिंदे-फडणवीस सरकारने त्यांच्याकडे 'एमएमआरडीए'तील अतिरिक्त आयुक्तपदावर बदली केली असून, रुबल अग्रवाल यांच्याकडे मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सोपवली आहे.
Rubal Agrawal
Rubal AgrawalSarkarnama

Rubal Agrawal and Mumbai Metro Metro: पुणे महापालिकेत धडाकेबाज निर्णय आणि अंमलबजावणीने चर्चेत राहिलेल्या, राज्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या 'कमिशनर' राहून 'स्मार्ट वर्क' करणाऱ्या 'आयएएस' रुबल अग्रवाल यांच्याकडे आता मुंबई मेट्रोचे 'कंट्रोल' राहणार आहे. म्हणजे, अग्रवाल यांच्या 'वर्किंग स्टाइल'मुळे शिंदे-फडणवीस सरकारने त्यांच्याकडे 'एमएमआरडीए'तील अतिरिक्त आयुक्तपदावर बदली केली असून, त्याअंतर्गत अग्रवाल Rubal Agrawal यांच्याकडे मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सोपवली आहे.

अग्रवाल यांच्या नेमणुकीने मुंबई मेट्रो Mumbai Metroआणखी 'फास्ट' होण्याची आशा आहे. याआधी एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्याकडे मेट्रोचा अतिरिक्त कार्यभार होता तो आता अग्रवाल यांनी घेतला आहे. राज्यात गेल्या 15-16 वर्षांत रुबल अग्रवाल या वेगवेगळ्या खात्यांत काम केले आहे.

Rubal Agrawal
Lok Sabha Election 2024 : वाशीम-यवतमाळ, बुलडाण्यात शिवसेना, तर अमरावती, वर्ध्यात भाजपला टेन्शन!

कोण आहेत रुबल अग्रवाल ?

रुबल अग्रवाल या 2008 बॅचच्या 'आयएएस' (भारतीय प्रशासकीय सेवा) अधिकारी आहेत. या काळात त्यांनी जळगावच्या जिल्हाधिकारी म्हणून काम केले. या काळात प्रचंड आक्रमकपणे प्रशासकीय यंत्रणेत बदल घडवून अग्रवाल यांनी बड्या राजकारण्यांना वठणीवर आणले होते. त्यामळे जिल्हाधिकारी म्हणून अग्रवाल यांची कारर्कीद गाजली. त्यानंतर त्यांच्याकडे शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची (सीईओ) जबाबदारी आली. आधीच चर्चेत असलेले हे पद पहिल्यांदाच महिला 'आयएएस'कडे आल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले. मात्र, या पदावर येताच त्यांनी संस्थानने आखलेल्या मात्र, रखडलेल्या योजनांना 'बूस्ट' दिला. त्यानंतर मात्र, 2019 मध्ये अग्रवाल यांची पुणे महापालिकेत PMC अतिरिक्त आयुक्तपदावर बदली झाली. या काळात त्यांच्याकडे महापालिकेतील आरोग्य खात्यासह महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी राहिली. याचदरम्यान कोरोना साथी आली.

सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या पुण्यातील आरोग्य व्यवस्था व्यापक करून, कोरोना नियंत्रण ठेवण्याची मोहीमही अग्रवाल यांच्याकडे राहिली. या साथीत महापालिकेचे 72 रुग्णालयांत उपचार व्यवस्था उभारण्यापासून जम्बो कोविड सेंटरही Jambo Covid Center त्यांची सांभाळले. कोविड काळातील अग्रवाल यांच्या निर्णयाचा धडाका दिसून आला आणि त्यांनी पुणेकरांची मने जिंकली. अतिरिक्त आयुक्त, जम्बो कोविड सेंटरच्या प्रमुखपदाची जबाबदारी असतानाच ऐन कोविडच्या काळात अग्रवाल यांच्याकडे पुणे स्मार्ट सिटी Pune Smart City Development डेव्हलपमेंट का्र्पोरेशनच्या 'सीईओ' म्हणून नेमणूक करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्यासाठी संकल्पनेतून उभारलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पा योजनांना गती देण्यात अग्रवाल यांचा पुढाकार राहिला. पुण्यात महत्त्वाच्या पदांवर काम केल्यानंतर अग्रवाल यांची राज्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तपदावर बदली करण्यात आली. कुपोषण रोखण्यापासून महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या या खात्यात अग्रवाल धाडसी निर्णय घेतले. त्याचा परिणाम म्हणजे, राज्याच्या प्रशासकीय सेवेतील मानाचा माजी मुख्य सचिव 'अरुण बोंगिरवार उत्कृष्ट प्रशासकाचा पुरस्कार अग्रवाल यांना मिळाला. आधी ठाकरे सरकार आणि त्यानंतर शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये त्यांच्याकडे हे खाते कायम राहिले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अग्रवाल यांची या खात्यातून महिला आर्थिक विकास महामंडळात बदली झालीत्यापलीकडे जाऊन मुंबईकरांसाठी

महत्त्वाच्या मेट्रोला अधिक गतिमान करण्यासाठी अग्रवाल यांची 'एमएमआरडीए'त बदली झाली आहे.दरम्यान या पदाचा कार्यभार मुखर्जी यांच्याकडून अग्रवाल यांनी सोमवारी स्वीकारला.

R

Rubal Agrawal
Shegaon News: मालमत्ता करावरून वाद पेटला, नगरपालिकेच्या विरोधात शहर संघर्ष समिती न्यायालयात जाणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com