धसांच्या आरोपवर फडणवीसांचे उत्तर! अमिताभ गुप्ता–जालिंदर सुपेकरांना मोठा दिलासा; काय आहे नेमकं प्रकरण?

CM Devendra Fadnavis: धसांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनी दिलेले उत्तर आणि अमिताभ गुप्ता व जालिंदर सुपेकरांना मिळालेला मोठा दिलासा. संपूर्ण प्रकरण, पार्श्वभूमी आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News : तत्कालीन पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त जालिंदर सुपेकर यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या सर्व शस्त्र परवान्यांमध्ये कोणतीही बेकायदेशीरता आढळून आलेली नाही. हे सर्व परवाने शस्त्र अधिनियम १९५९ व शस्त्र नियम २०१६ च्या तरतुदींनुसार वैधरित्या मंजूर करण्यात आले होते, असे गृह विभागाने स्पष्ट केले आहे.

विधिमंडळाच्या अतारांकित प्रश्नोत्तरांमधून ही माहिती समोर आली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी पुणे जिल्ह्यात जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता या दोघांनी मिळून प्रत्येकी २० लाख रुपये घेऊन ५६९ पिस्तुल परवाने दिल्यामुळे पुणे जिल्हा व परिसरात गुंडगिरी व दहशत मोठ्‌या प्रमाणात वाढली आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता.

Devendra Fadnavis
Congress News : अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यानंतर तीन वर्षांनी नांदेडमध्ये पक्ष भाकरी फिरवणार!

या विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी गृह विभागाने तयार केलेल्या उत्तरात म्हटले आहे की, अमिताभ गुप्ता यांच्या सेवा कालावधीत पुणे शहर पोलिस आयुक्तालयामार्फत एकूण ४३३ शस्त्र परवाने मंजूर करण्यात आले. हे सर्व परवाने संबंधित अधिकाऱ्यांनी कायद्याच्या पूर्ण अटी व शर्तींचे पालन करूनच दिले आहेत.

काही महिन्यांपूर्वी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी दिलेल्या शस्त्र परवान्यांची मोठी चर्चा झाली होती. या प्रकरणात सुपेकर व हगवणे यांच्यातील नातेसंबंधाचा उल्लेख करत सुपेकर यांनी काही व्यक्तींना परवाने मिळवून दिल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील सर्व शस्त्र परवान्यांची चौकशी करण्याची मागणी जोर धरली होती.

या पार्श्वभूमीवर गृह विभागाने आता दोन्ही अधिकाऱ्यांना पूर्ण क्लिन चिट दिली आहे. सुपेकर यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Devendra Fadnavis
Ladki Bahin Yojana eKYC : महत्त्वाची अपडेट; E-KYC साठी पुन्हा मिळाली मुदतवाढ! आदिती तटकरेंचे लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट!

दरम्यान, सुपेकर यांचे मेहुणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मालमत्तांचीही चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत कोणतीही अवैध किंवा असंपादित मालमत्ता आढळून न आल्याने ही चौकशी बंद करण्यात आल्याचे गृह विभागाने सांगितले आहे.

तसेच सन २०२० ते जून, २०२५ या कालावधीत परवानाधारक शख वापरल्याने १० गुन्हे दाखल झाले असून दाखल गुन्ह्यातील आरोपींना अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.अस स्पष्ट करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com