Pradip Shrama : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर आयकर विभागाची धाड

Income Tax department News : माजी खासदार आणि आमदाराच्या कर चुकवे प्रकरणी प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाने कारवाई सुरू केली असल्याचे समजते.
Pradip Sharma
Pradip SharmaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केल्याचे समजते. मुंबईतील अंधेरीतील त्यांच्या निवासस्थानी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. माजी खासदार आणि आमदाराच्या कर चुकवे प्रकरणी प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाने कारवाई सुरू केली असल्याचे समजते.

शर्मा यांच्या अंधेरीतील निवासस्थानी गुरुवारी दुपारी आयकर विभागाचे पथक पोहोचले आहे. माजी खासदार आणि आमदाराच्या कर चुकवे प्रकरणीसंबंधी एका प्रकरणात प्रदीप शर्मा यांच्या घरी शोध घेतला जात असल्याचे समजते. प्राथमिक माहितीनुसार आयकर विभागाकडून (Income tax Department) ही कारवाई केली जात असल्याचे समजते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pradip Sharma
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी बीडचं प्रकरण छेडलं; शिंदे सरकारला पुन्हा घेरलं, म्हणाले...

दरम्यान, जून २०२१ मध्ये एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी एनआयएने छापेमारी केली होती. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडली होती. त्यानंतर मनसुख हिरेन प्रकरणी एनआयए तपास असताना एनआयएने प्रदिप शर्मा यांच्या अंधेरीच्या घरी छापा टाकला होता.

प्रदीप शर्मा हे १९८३ मध्ये पोलीस दलात दाखल झाले होते. त्यांची कारकीर्द अतिशय वादात राहिली. रामनारायण गुप्ता उर्फ लखनभय्या याचा बनावट एन्काऊंटर आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध अशा आरोप प्रकरणात २००८ मध्ये प्रदीप शर्मा यांना निलंबित करण्यात आले होते.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार प्रदीप शर्मा यांच्या सोबत निवृत्त सनदी अधिकारी अजोय मेहता , निर्मलकुमार देशमुख आणि संजय पांडे यांच्या घर आणि कार्यालयात आयकर विभागाकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपी आहेत. ते वर्षभरापासून अधिक काळ जेलमध्ये होते. त्यानंतर नुकतंच त्यांना सुप्रीम कोर्टातून जामीन मंजूर झाला होता. ते जामिनावर बाहेर होते. त्यांचं अंधेरी आणि आणखी एका ठिकाणी निवासस्थान असल्याची माहिती मिळत आहे.

प्रदीप शर्मा यांच्या वतीने सुरुवातीला आयकर अधिकाऱ्याना विरोध करण्यात आला होता, मात्र त्यानंतर छापेमारी आणि शोध मोहीम सुरु आहे ,प्रकरण नेमकं काय आहे याबाबतची सविस्तर माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

(Edited by- Sachin waghmare)

त्यानंतर मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह प्रदीप शर्मा हे आरोपी आहेत. अँटेलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा हे आरोपी आहेत. याच प्रकरणात काही काळ त्यांनी तुरुंगवास भोगला. परंतु सर्वोच्च न्यायालयाने (High Court) ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांना जामीन दिला होता.

Pradip Sharma
Income Tax Raids: अबब ! खासदाराच्या घरात सापडली 'एवढी' मोठी कॅश; नोटा मोजता मोजता मशीनही थकल्या...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com