Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी बीडचं प्रकरण छेडलं; शिंदे सरकारला पुन्हा घेरलं, म्हणाले...

Maratha Vs OBC Reservation : राजीनाम्याबद्दल मुख्यमंत्री शिंदेंनी मौन पाळण्यास सांगितले होते.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : राज्यात आरक्षणावरुन मराठा विरुद्ध ओबीसी समाज असा लढा सुरू आहे. या लढ्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांविरोधात राज्यातले सगळे ओबीसी नेते एकवटले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी तर चक्क ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी मंत्रिपदाचा राजीनामाही दिला होता. आता भुजबळांनी पुन्हा एकदा बीडचे प्रकरण छेडून आपल्याच सरकारची कोंडी केली आहे. एका पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात ते भाष्य करत होते.

मराठा आरक्षण मिळावे यासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आमरण उपोषणाला बसले होते. त्या दरम्यान बीडमध्ये काही लोकांकडून आमदारांची घरे जाळण्यात आली. आमदारांची घरे, त्यांच्या गाड्या जळल्या होत्या. त्यावर सरकारने अद्यापर एक अवाक्षरही काढले नाही, असा थेट हल्लाबोल त्यांनी सरकारवर केला आहे. कुठल्याही पक्षातील नेत्याने, मग तो विरोधातला असो किंवा सत्तेतला, कोणीही आवाज उठवला नाही या गोष्टीसाठी. ही गोष्ट इतकी गंभीर होती, तरी देखील सगळे शांत होते, असा थेट हल्लाबोल करुन भुजबळांनी सरकारवर घरचा आहेर दिला.

Chhagan Bhujbal
Bhujbal Vs Jarange : "जरांगे, खरा पाटील असशील तर..." ; भुजबळांनी पुन्हा ललकारले!

मुख्यमंत्र्यांनीच मौन पाळण्यास सांगितले

17 नोव्हेंबरच्या ओबीसी मेळाव्यात मला सहभागी व्हायचे होते. यासाठी मी आधीच 16 नोव्हेंबरला माझा राजीनामा दिला होता. मी राजीनामा दिला आहे, हे सरकारमधील नेत्यांना कळले होते. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वतःहून मला, याबद्दल कुठेही बाहेर बोलू नका, असे सांगितले होते. मी त्यांनी म्हटले त्याप्रमाणे मौन बाळगले. कारण कोणीही माझा रजीनामा मागितला नव्हता, ना सत्ताधाऱ्यांनी ना विरोधकांनी.

Chhagan Bhujbal
Jarange On Raj Thackeray : नाशिकचं पाणीच वेगळं हाय; राज ठाकरेंच्या प्रश्नावर जरांगे पाटलांचं उत्तर

राज्य सरकारमधील एका आमदाराने मला डिवचले. जर भुजबळांना (Chhagan Bhujbal) सरकारचे म्हणणे पटत नसेल तर मग त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे त्या आमदाराने म्हटले. त्या वेळी मी माझे मौन सोडले, आणि सांगून टाकले, की 16 नोव्हेंबर रोजीच माझा राजीनामा मी दिला होता. आता तो स्वीकारायचा की नाही हे सरकार ठरवणार, असे म्हणत भुजबळांनी चेंडू सरकारच्या कोर्टात टोलावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठ्यांना खोटे दाखले

काही दिवसांपूर्वी मागासवर्गीय आयोगाकडून मराठा आरक्षणासाठी सर्व्हे केला होता. हे जे सर्व्हे केले त्याचाही समाचार भुजबळांनी घेतला. त्यांनी, जे काही सर्वेक्षण झाले आहे, त्यात बहुतेक लोकांनी खोटी माहिती दिली असल्याचा दावा केला आहे. भुजबळ म्हणाले, मराठ्यांना जर आरक्षण द्यायचे असेल तर मग त्यांना स्वतंत्र आरक्षण दिले पाहिजे. कुणबी दाखले काढून नाही. 15 दिवसांत किती जणांचे दाखले काढले जाऊ शकतात? आरक्षण मिळावे यासाठी मराठ्यांकडून खोटी माहिती दिली गेली आहे, असा थेट आरोप त्यांनी केला.

(Edited by Sunil Dhumal)

Chhagan Bhujbal
Jalna Lok Sabha: जालन्यात दानवेंच्या विरोधात कोण ? महाविकास आघाडीचा शोध संपेना...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com