Job Placement Agency Rules : नोकरीच्या नावाखाली तरूणांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी महायुती सरकारने उचललं मोठं पाऊल, 'हे' विधेयक केलं मंजूर

Maharashtra Placement Agency Bill 2025 : राज्यातील खाजगी प्लेसमेंट एजन्सींवर नियंत्रण आणि त्यांच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी तसंच या एजन्सींकडून बेरोजगार आणि नोकरी शोधणाऱ्या तरूणांची फसवणूक होऊ नये यासाठी सरकारने हे विधेयक मंजूर केलं आहे.
Maharashtra Placement Agency Bill 2025
Maharashtra Placement Agency Bill 2025Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 27 Mar : नोकरी शोधणाऱ्या तरूणांची फसवणूक होऊ नये यासाठी महायुती (Mahayuti) सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. राज्य सरकारने महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी (विनियमन) विधेयक 2025 हे दोन्ही सभागृहात मंजूर केलं आहे.

राज्यातील खाजगी प्लेसमेंट एजन्सींवर नियंत्रण आणि त्यांच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी तसंच या एजन्सींकडून बेरोजगार आणि नोकरी शोधणाऱ्या तरूणांची फसवणूक होऊ नये यासाठी सरकारने हे विधेयक मंजूर केलं आहे.

Maharashtra Placement Agency Bill 2025
Disha Salian Case: दिशा सालियनच्या मृत्यूचे खरं कारण आलं समोर; बलात्कार नाहीच; पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

या विधेयकाबाबतची माहिती देताना कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी सांगितलं की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापननेनंतर प्रत्येक विभागाला 100 दिवसांचा कार्यक्रम तयार करायला सांगितलं होतं.

त्यानुसार कौशल्य विकास विभागाकडून आम्ही महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी (विनियमन) विधेयक 2025 सादर केलं आहे. या विधेयकामुळे तरुणांच्या हक्कांचे संरक्षण होईल आणि प्लेसमेंट एजन्सीवर सुद्धा अंकुश राहील. तसंच आता प्रत्येक प्लेसमेंट एजन्सी सरकारच्या नोंदणीकृत चौकटीत असेल, यामुळे पारदर्शकता येईल आणि युवकांचा विश्वासही वाढेल."

Maharashtra Placement Agency Bill 2025
PM Narendra Modi Letter : पंतप्रधान मोदींनी बांग्लादेशला करून दिली 1971 च्या युध्दाची आठवण; मोहम्मद यूनुस यांना पत्र

दरम्यान, विधेयक आणण्याचा निर्णय ऐतिहासिक ठरेल असं विधानपरिषद सदस्यांनी म्हटलं. तसंच या विधेयकामुळे बनावट भरती प्रक्रियेतून होणारी बेरोजगारांची फसवणूक थांबवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाती आणि उमेदवारांचे रोजगारात्मक हित जोपासले जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

विधेयकातील तरतुदी

या विधेयकामुळे आता सर्व प्लेसमेंट एजन्सींना शासनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडे नोंदणी बंधनकारक असेल. चुकीची माहिती, खोटी कागदपत्रे, फसवणूक, माहितीचा दुरुपयोग, नोकरी प्रदान करण्यास निष्फळ ठरणे किंवा नकार देणे, शासनाच्या नावाने लोकांना भटकावणे अशा बाबी समोर आल्यास नोंदणी प्रमाणपत्र रद्द केलं जाईल.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com