NTPC recruitment : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी; 110 जागांसाठी भरती

NTPC recruitment News : एनटीपीसीमध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
NTPC news
NTPC news Sarkarnama
Published on
Updated on

NTPC News : सरकारी नोकरी मिळवण्याची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी केंद्राच्या अखत्यारीतील नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) या कंपनीमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. एनटीपीसीमध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये विविध विभागातील व्यवस्थापकांच्या जागा भरल्या जाणार आहेत. त्या संदर्भातील अधिकची माहिती जॉबनामा सदरामध्ये जाणून घ्या..

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीमध्ये एकूण 110 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. यामध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल आणि कॉम्प्युटर विभागातील डेप्युटी मॅनेजरची पदे भरली जाणार आहेत.

NTPC news
Nana Patole : महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटणार, नानांनी दिली `ही` तारीख !

यासाठी उमेदवार हा 60% गुणांसह B.E/B.Tech (Electrical/Mechanical/ Production/ Control & Instrumentation) उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवारास 10 वर्षे या क्षेत्रातील कामाचा अनुभव असावा. यासाठी उमेदवाराच्या वयाची अट ही 08 मार्च 2024 रोजी जास्तीत जास्त 40 वर्षांपर्यंत असावी. यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे वयाची अधिकची सूट देण्यात आली आहे, तर OBC साठी 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.

या भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता आणि कामाच्या अनुभवाची योग्य आणि अचूक माहिती अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने चुकीची अथवा खोटी माहिती दिल्यास उमेदवारांचा अर्ज बाद ठरवण्यात येणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या भरतीसाठी पत्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी (NTPC) च्या अधिकृत संकेतस्थळावर आपला अर्ज ऑनलाइन सादर करणे आवश्यत आहे. यासाठी उमेदवारांकडून भरती शुल्क आकारले जाणार आहे.

यामध्ये खुल्या आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांकडून 300/- रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे, तर मागासवर्गीय उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 08 मार्च 2024 पर्यंत आहे. भरतीचा अर्ज सादर करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एनटीपीसीच्या (careers.ntpc.co.in) वर भरतीची जाहिरात पाहवी. htpps://www.careers.ntpc.co.in

(Edited by : Sachin Waghmare)

R

NTPC news
East Central Railway Bharti 2024: रेल्वेत खेळाडूंना नोकरीची संधी; ऑफलाइन पद्धतीने अर्ज करा

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com