CM Shinde Video : मुख्यमंत्री शिंदेंसमोर मोठा पेच; कुठली तीन नावे राज्यपालांकडे पाठवणार

Governor Appointed MLA NEWS CM Eknath Shinde: महायुतीमधील तीन घटक पक्षांनाबारा जागा मिळणार आहेत. त्यात सर्वांत मोठा 'भाऊ' असलेल्या भाजपला सहा जागा, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) तीन जगा मिळणार असल्याचे समजते.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News: विधानसभा निवडणुकीला दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. १४ सप्टेंबरपर्यंत या निवडी होऊन शपथविधी होईल, अशी माहिती सुत्रांनी दिली.

ही आमदार निवड प्रक्रियेत महायुतीमधील तीन घटक पक्षांना या बारा जागा मिळणार आहेत. त्यात सर्वांत मोठा 'भाऊ' असलेल्या भाजपला सहा जागा, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) तीन जगा मिळणार असल्याचे समजते.

शिंदे गटाकडे असलेल्या तीन जागांसाठी तीस जण इच्छुक आहेत. त्या तीस जणांनी आपली बाजू शिवसेना पक्षनेत्यांकडे मांडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला आमदारकीची संधी देईल, असा विश्वास इच्छुकांना आहे. प्रत्येकाने मुखमंत्र्यांकडे फिल्डिंग लावली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामावर नाराज झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले दीपक सावंत यांना विधान परिषद आमदारपदी नियुक्ती केले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. सावंत यांचे नाव पुन्हा चर्चेत आहे. तर मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या नावाची चर्चा आहे.

CM Eknath Shinde
Mahayuti: महायुतीत जागा वाटपावरून पेच; शिवसेनेच्या 'या' दोन जागांवर राष्ट्रवादीनं ठोकला दावा

विधान परिषदेच्या माजी आमदार मनीषा कांयदे, पक्षाची संघटनात्मक जबाबदारी सांभाळणार संजय मोरे, गिरीश पांडव यांच्या गळात आमदारकीची माळ पडेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे भाजप विचारवंत, कलाकार, लेखक, कवि, पत्रकार यांना संधी देण्याच्या तयारीत आहे.

महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, त्यांच्या नावाला पक्षातूनच विरोध होण्याची शक्यता आहे. चाकणकरांच्या नावावर रुपाली पाटील ठोंबरे यांनी आक्षेप घेत ‘एकाच महिलेकडे किती पदे देणार,’ असा सवाल विचारला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आपल्या वाट्याला आलेल्या ३ जागांवरील नावे निश्चित केल्याचे समजते. यामध्ये राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी खासदार आनंद परांजपे आणि सिद्धार्थ कांबळे यांचा समावेश असल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com