Loksabha Election 2024 : शाहू महाराजांच्या आडून सर्वांना सामावून घेणाऱ्या विचारांवर हल्ला!

Sanjay Mandlik Vs Shahu Maharaj : महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे खरे वंशज नाहीत, असे विधान करून महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केले आहे. याद्वारे त्यांनी महाराजांच्या सर्वांना सामावून घेणाऱ्या विचारसरणीवर हल्ला केला आहे.
Shahu Maharaj chhatrapatu sanjay mandlik
Shahu Maharaj chhatrapatu sanjay mandliksarkarnama

Kolhapur Loksabha Election : कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे वारसदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत. सामाजिक सलोख्याची घडी विस्कटलेली असतानाच्या या काळात छत्रपती शाहू महाराज हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. समतेच्या विचारांसाठी लढाई लढत आहेत, ही एकंदर समाज आणि राज्याच्या दृष्टीने दिलासा देणारी बाब आहे. मात्र, राजकारणाने सर्व मर्यादा ओलांडल्याचा हा काळ आहे. अशा काळात छत्रपती घराण्याच्या वारसादाराचीही सुटका होणार नाही, असा संदेश या निवडणुकीने दिला आहे.

भारतातील बहुतांश राजघराण्यांचे वारस हे दत्तक आलेले आहेत. त्यात नवीन असे काहीही नाही. असे असतानाही छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे खरे वंशज आहेत का, असा प्रश्न महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी उपस्थित केला आहे. राजकारणी, निवडणुकीतील उमेदवार म्हणून काय प्रचार करावा, कोणते मुद्दे उपस्थित करावेत, असे कोणावर बंधन नसते, असे एकूण चित्र देशात दिसत आहे. तसे बंधन मंडलिक यांच्यावरही नसणार, हे साहजिक आहे. नाहीतरी गेल्या काही वर्षांपासून आपल्या वाटेतील अडथळे दूर करण्यासाठी राजकीय नेते कोणत्याही थराला जात असल्याचे चित्र दिसत आहे. तीच परंपरा आता पुढेही सुरू राहील, असे दिसत आहे.

Shahu Maharaj chhatrapatu sanjay mandlik
Shirur News: संतापजनक! गर्भवती महिलांच्या किटमध्ये आढळल्या अळ्या; मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...

निवडणूक जिंकण्यासाठी द्वेषाची बीजे पेरली जात आहेत. दोन समाजांत अविश्वास निर्माण केला जात आहे. त्यामुळे सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अशा काही नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. अशा या वातावरणात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या निवडणूक लढण्याला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. त्याला एक वेगळा आयाम मिळाला आहे.

शाहू महाराजांची (Shahu Maharaj) विचारसरणी सर्वांना सामावून घेणारी आहे, ती भेदाभेद करणारी नाही. शाहू महाराजांच्या उमेदवारीमुळे राज्यभरात एक वेगळा संदेश गेला आहे. दबावाखाली जगणाऱ्या समूहांना तो एक आशेचा किरण वाटत आहे. मंडलिक आणि महायुतीसाठी ही बाब डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे मंडलिक यांनी सर्वांना माहीत असलेला, नावीन्य नसलेला मुद्दा ऐन निवडणुकीत उपस्थित केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देशात, राज्यात एकछत्री अंमल असावा, असे सध्याच्या देशातील, महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना वाटते. त्यांच्या या उद्देशातील सर्वात मोठा अडथळा होते शरद पवार. शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे हेही त्यांच्या मार्गातील अडथळा ठरू लागले. शरद पवार यांची मानहानी व्हावी, त्यांची बदनामी व्हावी यासाठी गेल्या दहा वर्षांपासून असे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्यावर चौफेर टीका करण्यासाठी वेगवेगळी माणसे सोडण्यात आली आहेत.

राहुल गांधी यांच्यावरही असेच प्रयोग गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत, मात्र ते ठाम उभे आहेत. शरद पवार यांच्याबाबतीतही असेच झाले होते. शेवटचा उपाय उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ शरद पवार यांच्याही पक्षात फूट पाडण्यात आली. तरीही शरद पवार, उद्धव ठाकरे हे दोघे ताठ मानेने उभे आहेत, किंबहुना त्यांनी महायुतीसमोर कडवे आव्हान उभे केले आहे.

शरद पवार (Sharad Pawar) यांनीच छत्रपती शाहू महाराज यांना निवडणूक लढवण्यासाठी राजी केले आहे. समाजात शाहू महाराजांविषयी आदर आहे. त्याला धक्का देण्यासाठी ते खरे वंशज आहेत का, असा प्रश्न आता निवडणुकीत उपस्थित केला जात आहे. शाहू महाराजांसह बहुतांश गाद्यांचे वारस हे दत्तक आलेले आहेत, हे लोकांना आधीच माहीत आहे.

Shahu Maharaj chhatrapatu sanjay mandlik
Vasant More News : 'साहेब मला खासदार करा…'; वसंत मोरेंचा नवा ‘प्रयोग’

मंडलिक यांनी शाहू महाराजांच्या दत्तक प्रकरणावर केलेले विधान त्यांच्या पक्षाचे धोरण आहे का, अशी शंकाही उपस्थित केली जाऊ लागली आहे. कारण मंडलिक आपल्या विधानावर, भूमिकेवर ठाम आहेत. शाहू महाराज हे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे थेट वंशज आहेत, हे सिद्ध करा, तरच माफी मागतो, असे त्यांनी विरोधकांना सुनावले आहेत.

शाहू महाराज हे दत्तक आहेत म्हणून त्यांचे महत्व, त्यांच्याविषयीचा आदर कमी होत नाही. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांना मात्र तसे करायची इच्छा असू शकते, असे त्यांच्या भूमिकेवरून दिसून येत आहे. मंडलिक हे शाहू महाराजांविषयी विधाने करत असले तरी त्यांच्या निशाण्यावर शाहू महाराजांची सर्वांना सामावून घेणारी विचारसरणी आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

(Edited By Deepak Kulkarni)

Shahu Maharaj chhatrapatu sanjay mandlik
Sanjay Mandlik News : "थेट वंशज असल्याचं सिद्ध करा, तरच...", मंडलिकांनी विरोधकांना ठणकावलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com