Ladaki Bahin Yojna : पालकमंत्री मुश्रीफांचा बँकांना दम, लाडक्या बहिणींचे कट केलेले पैसे जमा करा

Hasan Mushrif On Ladaki Bahin Yojna : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बँकांना सूचना केल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील सर्व बँकांच्या प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.
Hasan Mushrif On Ladaki Bahin Yojna
Hasan Mushrif On Ladaki Bahin YojnaSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 11 Sep : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनेक लाभार्थी महिलांना मिळालेल्या अनुदानाची रक्कम 'मिनिमम बॅलेन्स'च्या नावाखाली तसेच हप्ते थकल्याच्या कारणांसाठी बँकांनी पैसे कपात केल्याच्या घटना घडल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बँकांना सूचना केल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील सर्व बँकांच्या प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.

यावेळी पालकमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यातून विविध कारणांसाठी कपात करू नयेत करु नये, सर्व बँकांनी कपातीची रक्कम तातडीने परत करावी, असा सज्जड दम बँक अधिकाऱ्यांना दिला आहे. या संदर्भातील बैठक कोल्हापूर (Kolhapur) जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

Hasan Mushrif On Ladaki Bahin Yojna
Mumbai Police : भाजपच्या बड्या नेत्याची चौकशी सुरू; हायकोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांची कारवाई

जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 9 लाख 22 हजार 770 अर्ज ऑनलाईन मंजूर करण्यात आले असून आतापर्यंत ऑनलाईन अर्जाचे 99.83 टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, बँकांनी महिलांच्या बँक खात्यावरील पैसे विविध कारणावरून कपात केले आहेत. ही बाब राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यासंदर्भात पालकमंत्री मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील लाभार्थ्यांची 'मिनिमम बॅलेन्स सह अन्य कारणांनी कपात केलेली रक्कम बँकांनी परत द्यावी. काही बँकांनी कपातीची रक्कम परत केली असून ज्या बँकांनी अद्याप ही रक्कम परत केलेली नाही त्या सर्व बँकांनी तातडीने कपातीची रक्कम परत करावी, अशा सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या. बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा अग्रणी बँकेचे गणेश गोडसे तसेच इतर सर्व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Hasan Mushrif On Ladaki Bahin Yojna
Sanjay Raut On Ajit Pawar : अजितदादांना मुख्यमंत्री बनण्याचा हक्क; पहा संजय राऊत कोणाशी करताहेत तुलना

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, या योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांना या महिन्यातही नोंदणी करता येणार असून येत्या ३० सप्टेंबरपर्यंत पात्र महिलांनी नोंदणी करावी. या महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांचा अर्ज पात्र ठरला, तर त्यांना जुलै पासून तीन महिन्यांचा लाभ मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ज्या महिलांच्या बँक खात्याला आधार कार्ड जोडलेले नाही, ती प्रक्रियाही गतीने पूर्ण करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी सर्व बँक प्रतिनिधींना केल्या. जिल्ह्यातील आधार लिंक नसलेल्या 1.38 लाख लाभार्थींचे आधार बँकांनी वेळेत लिंक केले. तसेच उर्वरित लाभार्थींची आधार जोडणी वेळेत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com