Sanjay Raut On Ajit Pawar : अजितदादांना मुख्यमंत्री बनण्याचा हक्क; पहा संजय राऊत कोणाशी करताहेत तुलना

Sanjay Raut big statement on Ajit Pawar Chief Ministership : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अपेक्षेवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केले आहे.
Sanjay Raut On Ajit Pawar
Sanjay Raut On Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजप नेते अमित शाह दोन दिवस मुंबई दौऱ्यावर असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बिहार पॅटर्ननुसार विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री करा, असा प्रस्ताव पवार यांनी शाह यांना दिल्याची चर्चा होती.

यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची तुलना करताना संजय राऊत यांनी 'बेईमानी' हा टोकाचा शब्द वापरला. संजय राऊत यांच्या 'बेईमानी' या शब्दामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघणार, असे दिसते.

शिवसेनेचे संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. अमित शाह यांच्यासमोर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रस्तावावर संजय राऊत यांना विचारले, असताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या अनुभवाची तुलना करत निशाणा साधला. संजय राऊत यांनी ही तुलना करताना टोकाचा शब्द वापरला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Sanjay Raut On Ajit Pawar
Devendra Fadnavis: फडणवीस बरसले, महाविकास आघाडीला म्हणाले, 'तोंड' वर करून निवडणुकीत येतात"

संजय राऊत म्हणाले, "अजित पवार वरिष्ठ आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यापेक्षा ते वरिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांचाच मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचाच हक्क बनतोना?, अनुभवाचा आधार घेतल्यास, 'बेईमानी' बघता, तर शिंदेपेक्षा जास्त 'बेईमानी' अजित पवार यांनी देखील केली आहे. 'बेईमानी'चा जर तराजू बघता, तर दोघे समान आहेत. यात अजित पवार यांना सर्वात जास्त हक्क आहे, मुख्यमंत्री बनवण्याचा".

Sanjay Raut On Ajit Pawar
Ramdas Athawale : 'उद्धव ठाकरेंना त्यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी घोषित करावं, अशी तीव्र इच्छा होती, मात्र..'

जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

अजित पवार यांच्या पक्षाची स्थिती मुख्यमंत्रीपद मागण्यासारखी नाही. निवडणुकीपूर्वी ते अशी मागणी करणार नाहीत, असे मिश्किल टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. भाजप सध्या सगळ्यात मोठा पक्ष आहे. तिथे मुख्यमंत्रीपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे ते अजित पवारांना मुख्यमंत्री करतील, असे वाटत नाही, असेही जयंत पाटील यांनी म्हटलं.

अजित पवारांकडून खंडन

अमित शाह यांच्या दौऱ्यात मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे अजित पवार यांनी कालच स्पष्ट केलं आहे. ती फक्त अफवा आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत नाही, तर सोयाबीन, कापूर, कांदा निर्यातबंदीसह राज्यात अन्य मुद्यांवर चर्चा झाल्याचे अजित पवार यांनी सांगितलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com