Kolhapur News : सरकारचा पैसा वरिष्ठ सहायकाच्या बँक खात्यात, गडहिंग्लज पंचायत समितीत तब्बल 23 लाखांचा गैरव्यवहार

Kolhapur News Gadhinglaj Panchayat Samiti Scam : सरकारचा पैसा वरिष्ठ सहाय्यकाच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गडहिंग्लज पंचायत समितीमध्ये तब्बल 23 लाख 67 हजाराचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Kolhapur News
Kolhapur NewsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 21 Sep : सरकारचा पैसा वरिष्ठ सहाय्यकाच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गडहिंग्लज पंचायत समितीमध्ये तब्बल 23 लाख 67 हजाराचा अपहार झाल्याचे आज द्विसदस्यीय समितीने केलेल्या चौकशीत हे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे शासकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. गट शिक्षण अधिकाऱ्यांनी गडहिंग्लज पंचायत समितीमध्ये 21 लाखांचा अपहार झाल्याचे जिल्हा परिषदेकडे कळविले होते. या तक्रारीत वरिष्ठ सहाय्यक दयानंद पाटील यांनी अपहार केल्याचे तक्रारीत नमूद केले होते.

त्यानंतर गडहिंग्लज पंचायत समितीतील द्विसदस्यीय चौकशी झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. गट शिक्षण अधिकाऱ्यांनी तक्रार दिल्यानंतर उपमुख्य लेखा वित्त अधिकारी अरुण हजबे आणि उपशिक्ष अधिकारी टोणपे यांची द्विसदस्यीय समिती तयार करण्यात आली होती.

Kolhapur News
Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार बंपर लॉटरी; मोदी सरकारचे नववर्षात ‘गिफ्ट’

या समितीला 10 सप्टेंबरपूर्वी हा अहवाल जिल्हा परिषदेकडे देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या होत्या. या द्विसदस्यीय समितीने चौकशी केल्यानंतर दयानंद पाटील यांनी 21 लाख नव्हे तर तब्बल 23 लाख 67 हजार 97 रुपये स्वतःच्या खात्यात हस्तांतर केल्याचे उघडकीस आले होते. चौकशीअंती हा प्रकार स्पष्ट झाल्यानंतर दयानंद पाटील यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते.

कोरोना काळात कर्मचाऱ्यांच्या खात्यावर मूळ पगार, घरभाडे, महागाई भत्ता गरजेपेक्षा जास्त जमा झाली होती. ज्यादा झालेली रक्कम परत करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या होत्या. मात्र ती परत न करता दयानंद पाटील यांनी स्वतःच्या खात्यावर सर्वाधिक वीस लाखाची रक्कम हस्तांतरित केली.

तर वरिष्ठ सहायक, तीन विस्तार अधिकारी, तीन परिचर यांच्या नावावरही जास्त रक्कम हस्तांतरित केल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट होत आहे. तर उर्वरित दोन लाख विस्तार अधिकारी, एक महिला विस्तार अधिकारी, एक शिपाई, एक महिला परिचर यांच्या नावावर रक्कम हस्तांतरित केले आहे.

Kolhapur News
Kolhapur Politics : मुश्रीफांना पाटलांची मैत्री महागात पडणार, विधानसभेला महाडिक गट 10 वर्षाचा हिशेब चुकता करणार?

2019-2024 या वर्षात इतकी पैसे केले ट्रान्सफर

2019-20 मध्ये 3 लाख 93 हजार 780 रुपये, 2020-21 मध्ये 4 लाख 13 हजार 63 रुपये, 2021-22 मध्ये 3 लाख 93 हजार 625 रुपये, 2022-23 मध्ये 4 लाख 90 हजार 500 रुपये, तर 2023-24 मध्ये 4 लाख 78 हजार 500 असा एकूण 23 लाख 67 हजार 97 रुपयांचा अपहार झाल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com