Kolhapur ZP News : गावबोभाटा झाला; सुंदर गाव पुरस्कार योजनेचा निकाल फुटला

Political News: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात परस्पर निकाल जाहीर झाला.
Kolhapur Zp
Kolhapur Zp Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: ग्रामविकास विभागाच्यावतीने देण्यात येणारा आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेचा निकाल फुटला आणि गावबोभाटा झाला. हातकणंगले तालुक्यातील गावांचा मूल्यमापन झालेला निकाल फुटल्याचे गुरुवारी उघड झाले. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेत (Kolhapur ZP) एकच खळबळ उडाली. शासन आदेशानुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (Zp CEO) पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या समितीने निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. मात्र फंदफितुरी झाली आणि हातकणंगले तालुक्यात परस्पर निकाल जाहीर झाला. याबद्दल आश्चर्य व्यक्त आहे.

गाव खेड्याच्या विकासांतर्गत राज्य सरकारने कै. आर. आर. पाटील यांच्या स्मरणार्थ गावातील स्वच्छता मूल्यांकन करून पुरस्कार देण्यात येतो. दरवर्षी तालुकास्तरावर हा पुरस्कार प्रत्येक ग्रामपंचायतीला देण्यात येतो. स्वच्छता, पारदर्शक कारभार, व्यवस्थापन, अपारंपरिक ऊर्जेचा वापर, पर्यावरण रक्षणासाठीचे उपक्रम, तंत्रज्ञानाचा वापर यावर आधारित गावांचे मूल्यमापन होते. जिल्हा तपासणी समिती स्थापन करून तपासणीची प्रक्रिया राबवली जाते.

Kolhapur Zp
Lok Sabha Election 2024 : भाजपचं सगळं ठरलं, 'असा' आहे विजयाचा मेगा प्लॅन?; तयारीवर फिरवणार शेवटचा हात

जिल्हा स्तरावरील समितीकडून तालुकानिहाय मूल्यांकन झालेल्या विजेत्या गावांची नावे जाहीर होतात. विजेत्यांना १६ फेब्रुवारीला आर. आर. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालकमंत्र्यांच्याहस्ते आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत विजेत्या ग्रामपंचायतींना बक्षीस वितरण करण्यात येते. मात्र, जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी यांच्या समितीलाच त्याचा निकाल जाहीर करण्याचा अधिकार असतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवड, जाहीर करण्याच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह

या समितीला फाट्यावर बसून हातकणंगले तालुक्यातून सुुुंदर गावांचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली या गावाला पुरस्कार मिळाल्याचा मॅसेज समाज माध्यमात व्हायरल झाला. यासंबंधीची अधिकृत माहिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत प्रशासनाकडे नव्हती. परिणामी जिल्हास्तरीय समितीचा पुरस्कार वितरणाचा अधिकार वापरून तालुकास्तरावरूनच निकाल जाहीर झाल्यामुळे पुरस्कार निवड आणि जाहीर करण्याच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

(Edited by- sachin waghhmare)

Kolhapur Zp
Kolhapur Politics : कोल्हापुरात राजकीय नाट्य : सतेज पाटील-धनंजय महाडिक यांच्यात खडाजंगी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com