IAS Transfar
IAS TransfarSarkarnama

IAS Transfers : बदल्यांचे सत्र सुरूच! राज्यातील 8 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा यादी

Senior IAS officers transfer list : राज्यात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरुच आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यातील 12 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.
Published on

राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यापासून नव्या मंत्र्यांनी आपापल्या विभागाची सूत्रे स्वीकारताच प्रशासकीय फेरबदलांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरुच आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यातील 12 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

राज्यातील मुंबई ते गडचिरोलीपर्यंत अनेक विभागातील अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. काल 8 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. तसेच या बदल्यानंतर आता एन.नवीन सोना यांची एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

IAS Transfar
Pune Collector : पती कलेक्टर, पत्नी IPS अन् मेहुणा महापालिका आयुक्त; तिघेही पुणे जिल्ह्यात कार्यरत, 'हे' कुटुंबच नादखुळा!

Maharashtra IAS Transfer List : 'या' अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या?

अतुल पाटणे (IAS:RR:1999) यांची आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मुंबई यांची सचिव (पर्यटन), पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ऋचा बागला (IAS:RR:1999) यांना प्रधान सचिव (लेखा आणि कोषागार), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

अंशु सिन्हा (IAS:RR:1999) यांची प्रधान सचिव (वस्त्र), सहकार, विपणन आणि वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

एन.नवीन सोना (IAS:RR:2000) प्रधान सचिव (2), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांची उपमुख्यमंत्री (एकनाथ शिंदे), मंत्रालय, मुंबई यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

IAS Transfar
IAS Love Story: पती-पत्नी दोघेही कलेक्टर; लग्नासाठी बदलावं लागलं केडर, रंजक प्रेमकहाणी !

डॉ. रामास्वामी एन. (IAS:RR:2004) सचिव (लेखा आणि कोषागार), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सचिव (ADF) कृषी आणि ADF विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

वीरेंद्र सिंह (IAS:RR:2006) सचिव (वस्त्र), सहकार, विपणन आणि वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सचिव (2), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

प्रदीप पी. (IAS:RR:2009) यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

माणिक गुरसाल (IAS:SCS:2009) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई यांची महानगर आयुक्त, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

2 जानेवारीला 'या' अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. यातील काहींना पदोन्नती देण्यात आली आहे. गुरुवारी ज्या अधिकाऱ्यांची बदली झाली त्यात सुहास दिवसे, हर्षदीप कांबळे, मिलिंद म्हैसकर, वेणुगोपाल रेड्डी, जितेंद्र डुडी यांची प्रमुख नावे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com